Kartik Purnima 2024: तीन विशेष योगात साजरी होणार कार्तिक पौर्णिमा, या उपायांनी होतील सर्व मनोकामना पूर्ण

Kartik Purnima 2024: हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आषाढी आणि कार्तिक पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते.
Kartik Purnima 2024
Kartik Purnima 2024Saam Tv
Published On

(कार्तिक पौर्णिमा 2024) हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आषाढी आणि कार्तिक पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते. आज कार्तिकी पौर्णिमा आणि गुरू नानक जयंती असे दोन सण साजरे होत आहेत. कार्तिकी पौर्णिमेला गंगा स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा आकार पूर्ण गोल असतो.

धार्मिक(Religious) मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला दान, स्नान आणि अर्घ्य देण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता, म्हणून या तिथीला (Date)त्रिपुरा तिथी असेही म्हणतात

कार्तिक पौर्णिमा 2024 शुभ मुहूर्त

कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथी 15 नोव्हेंबरला म्हणजेच आज सकाळी 6.19 वाजता सुरू झाली आणि 16 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या पहाटे 2.58 वाजता पौर्णिमा तिथा समाप्त होईल. उदयतिथीनुसार आजच कार्तिक पौर्णिमा साजरी केली जात आहे. आज तुम्ही अभिजीत मुहूर्तावर स्नान करून दान करू शकता. ज्याची वेळ सकाळी 11:44 ते दुपारी 12:27 अशी असेल. कार्तिक पौर्णिमेला आज गजकेसरी योग, बुधादित्य राजयोग आणि शश राजयोगही तयार होत आहे. या सर्व गोष्टी अतिशय खास मानल्या जातात.

कार्तिक पौर्णिमा पूजा विधी

पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून उपवास करण्याचा संपल्प करा आणि पवित्र नदीत स्नान करा. या दिवशी शिव, संभूती, संती, प्रीती, अनुसूया आणि क्षमा या सहा कृतिकांची पूजा केली पाहिजे. मेंढीचे दान केल्याने ग्रहयोगातील संकटे नष्ट होतात. कार्तिक पौर्णिमेपासून सुरू होऊन प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी रात्रीचे व्रत आणि जागरण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. कार्तिक पौर्णिमेला व्रत करणाऱ्या व्यक्तीने गरजूंना अन्नदान करावे.

मनोकामना पूर्ण करण्यासाठी अवश्य करा हे उपाय  कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हार बनवून मुख्य दरवाजावर ठेवल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते. असे केल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते.  या दिवशी भगवान विष्णू नद्यांमध्ये निवास करतात, जेथे स्नान केल्यावर सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि महान पुण्य प्राप्त होते. याशिवाय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दान करणे देखील शुभ मानले जाते.

(डिस्केमर- वरिल माहिती उपलब्ध स्रोतवरून देण्यात आली आहे. याच्या तथ्थांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Kartik Purnima 2024
Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com