Jhonny tiger travel for tigress
Jhonny tigerGoogle

Johnny Tiger Migrate : जोडीदाराची ओढ, ३० दिवस, ३०० किलोमीटर प्रवास; 'जॉनी' वाघाची अनोखी स्टोरी!

Johnny Tiger Migrate: वाघ आपल्या शिकारीसाठी बराच काळ संयमाने वाट पाहतात. हे तर आपण ऐकून आहोत पण ते जोडीदार शोधण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास देखील करतात हे तुम्हाला माहिती आहे का? 
Published on

महाराष्ट्रातील नांदेडमधील किनवट येथील जॉनी हा प्रौढ वाघ सध्या आपल्या जोडीदाराच्या शोधात निघाला आहे. वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिवाळा हा वाघांसाठी मिलनाचा काळ असतो. जेव्हा त्यांना त्यांच्या प्रदेशात एकही जोडीदार सापडत नाही तेव्हा काही नर वाघ मादी वाघांच्या शोधात लांबचा प्रवास करतात. ते सहसा कुटुंब तयार करून त्यांचे ध्येय पूर्ण करतात. ते बछड्यांसाठी प्रदेश सोडतात आणि दुसरा प्रदेश शोधतात.

जोडीदाराच्या शोधात जॉनीचा प्रवास आता जवळपास 30 दिवसांत आदिलाबाद आणि निर्मल जिल्ह्यासह 300 किमी पेक्षा जास्त झाला आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्याने प्रवास सुरू केला होता. जॉनी हा महाराष्ट्रातील एक 7 वर्षांचा वाघ आहे. काही दिवसातच या भागातील जंगलात त्याला मादी वाघीण सापडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील नर वाघ प्रत्येक हिवाळ्यात जोडीदारासाठी पूर्वीच्या आदिलाबाद जिल्ह्यातील जंगलात स्थलांतर करतात, असे जिल्हा वन अधिकारी प्रशांत बी पाटील यांनी सांगितले.

Jhonny tiger travel for tigress
International Men's Day 2024: सावधान; 'या' आजारचे पुरुष ठरू शकतात बळी...

वाघाला इतक्या अंतरावरूनही येतो वाघीणीने सोडलेला सुगंध

अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाघांना वाघीणीने सोडलेला विशेष सुगंध 100 किमी अंतरावरूनसुद्धा येतो ज्यामुळे त्यांना एकमेकांना शोधणे सोपे होते. त्यांनी सांगितले की नर वाघ सहजपणे सुगंध पकडू शकतात आणि मादी वाघ शोधू शकतात.

जॉनीने उत्नूर मंडलात प्रवेश करण्यापूर्वी निर्मल जिल्ह्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील बोथ, कुंतला, सारंगापूर, ममदा आणि पेंबी मंडळांच्या जंगलांचा दौरा केला आहे. प्रवासात त्याने पाच गुरांची शिकार केली. त्याने आतापर्यंत या प्रदेशात गायींना मारण्याचे तीन अयशस्वी प्रयत्न केले. तो उटनूरमधील लालटेकडी गावाजवळ रस्ता ओलांडताना दिसला तसेच तो नारनूर भागात फिरत होता, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

Edited By- Nitish Gadge

Jhonny tiger travel for tigress
Weight Loss: डाएट, जीम करूनही वजन कमी होत नाहीये? 'हे' ५ पदार्थ वाढवतात तुमचा फॅट
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com