Water Tank Cleaning Hacks : टाकीत साठवलेलं पाणी १०० वर्षे सुद्धा खराब होणार नाही; करा 'हा' गावरान उपाय

Jamun Tree Branches for Cleaning Water : जांभळाच्या फांदीत असलेल्या गुणांमुळे पाण्यात ही फांदी किंवा याचे लाकूड जसेच्या तसेच राहते. लाकूड आणि पाणी दोन्ही कधीच खराब होत नाही.
Jamun Tree Branches for Cleaning Water
Water Tank Cleaning HacksSaam TV
Published On

घरात असलेली पाण्याची टाकी वर्षातून किंवा सहा महिन्यांतून एकदा साफ करावीच लागते. टाकी साफ करण्याचे काम फारच त्रासदायक असते. कारण यामध्ये बराच वेळ जातो शिवाय पैसे देखील जास्त खर्च होतात. टाकी साफ करण्यासाठी व्यक्ती विविध ट्रिक वापरतात. मात्र पाणी कधीच खराब होणार नाही, अशी एखादी वस्तू पाण्यात टाकली तर? तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र पाण्याच्या टाकीमधील पाणी तब्बल १०० वर्ष सुद्धा खराब होणार नाही अशी एक वस्तू आम्ही शोधली आहे.

Jamun Tree Branches for Cleaning Water
Jamun Fruit | Jambhul Fruit Price Hike | जांभूळ पिकले, भाव किती?

जांभूळ तुम्ही सर्व जण खाल्ले असेल. उन्हाळ्यामध्ये जांभूळ फळ बाजारात मिळतात. जांभळाचे आपल्या आरोग्यासाठी आणि केसांसाठी अनेक फायदे आहेत. जसे फळाचे आपल्या आरोग्यासाठी फायदे आहेत त्याचप्रमाणे याच्या फांद्या आणि लाकूड सुद्धा विविध गोष्टींसाठी उपयुक्त आहे. पाणी १०० वर्ष सुद्धा चांगलं रहावं यासाठी तुम्हाला सुद्धा जांभळाच्या फांदीचा किंवा लाकडाचा उपयोग करावा लागणार आहे.

जांभळ्याच्या फांदीचे अन्य फायदे

पाणी स्वस्छ राहते

जांभळाच्या फांदीत असलेल्या गुणांमुळे पाण्यात ही फांदी किंवा याचे लाकूड जसेच्या तसेच राहते. लाकूड आणि पाणी दोन्ही कधीच खराब होत नाही.

बोट बनवण्यासाठी उपयोग

जांभूळ झाडाच्या फांदीचा हाच उपयोग लक्षात घेऊन पूर्वीच्या काळी आणि आता देखील बोट बनवताना जांभळाच्या लाकडाचा उपयोग केला जातो.

डायबिटीजच्या रुग्णांसाठी उपयोगी

जांभूळ झाडाच्या फांदीसह, फळ आणि बियांचा देखील फार उपयोग आहे. जांभूळ फळाच्या बिया डायबिटीजच्या रुग्णांसाठी रामबाण आहेत. या बिया पाण्यात उकळवून घ्या, त्यानंतर या पाण्यात लिंबू पिळून याचे सेवन करा. याने तुम्हाला डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत होईल.

दात साफ करण्यासाठी

गावी काही व्यक्ती कडूलिंबाच्या काठीने दात स्वच्छ करतात तर काही जण जांभळाच्या काठीने दात स्वच्छ करतात. यामुळे दात अतीशय मजबूत आणि कडक होतात. दातांना किड असल्यास ती सुद्धा निघून जाते.

Jamun Tree Branches for Cleaning Water
Benifits of Jamun Seeds: मधुमेह नियंत्रित ठेवायचंय? जांभळांच्या बियां ठरतील फायदेशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com