Jalgaon Religious Places : निसर्गाचं सानिध्य अन् भक्तीचा मेळ, जळगावातल्या धार्मिक स्थळांना भेट द्याच!

Jalgaon Trip : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याला भेट द्या आणि तेथील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अनुभवा.
Jalgaon Trip
Jalgaon Religious Places SAAM TV
Published On

महाराष्ट्राला मोठी ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्र विविधतेने नटलेला आहे. अनेक जिल्हे, तालुके मिळून हा महाराष्ट्र उभा आहे. याच महाराष्ट्रातील जळगाव (Jalgaon) हे नयनरम्य ठिकाण आहे. अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देतात आणि निसर्ग सौंदर्यासोबत अध्यात्माचा आनंद घेतात. जळगावला अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. येथील काही प्राचीन किल्ल्यांची तसेच पुरातन मंदिरांची आज ओळख करून घेऊयात.

श्री क्षेत्र पद्मालय

श्री क्षेत्र पद्मालय हे जळगावपासून जवळ आहे. येथे तुम्ही आपल्या कुटुंबासोबत भेट देऊ शकता. या मंदिराच्या जवळ तलाव आहे. यात अनेक कमळे पाहायला मिळतील. हे मंदिर गणेशाचे आहे. श्री क्षेत्र पद्मालय हे मंदिर अर्धा पीठ म्हणून ओळखले जाते. या मंदिरात दोन गणपतीच्या मूर्ती आहेत. ज्यांची नावे आमोद आणि प्रमोद अशी आहेत.

उनपदेव

तुम्ही जळगावला एक दिवसाची पिकनिक प्लान करत असाल तर उनपदेव हे बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही येथे तुमच्या कुटुंबासोबत तसेच मित्रमंडळींसोबत येऊ शकता. उनपदेवला गरम पाण्याचा झरा आहे. या जागेचा उल्लेख रामायणात केला आहे. या ठिकाणाला मोठे धार्मिक महत्त्व आहे.

पारोळा किल्ला

पारोळा किल्ला हा जळगावमधील प्राचीन किल्ला आहे. हा किल्ला बोरी नदीजवळ आहे. हा किल्ला राणी लक्ष्मीबाई यांच्या काळातील आहे. येथे पर्यटक आवर्जून येतात. या किल्यावरून जळगावचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. पारोळा किल्ला हा संस्कृती आणि कलेचा उत्तम नमुना आहे. या किल्ल्याची विशेष रचना करण्यात आली आहे.

Jalgaon Trip
Nalasopara Picnic Spot : हा सागरी किनारा... निसर्गाच्या सानिध्यात लपलेत नालासोपाऱ्यातील पिकनिक स्पॉट्स

संत मुक्ताबाई मंदिर

जळगाव हे धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. संत मुक्ताबाई मंदिर हे जळगाव मधील सर्वात पवित्र ठिकाण आहे. येथे अनेक स्थानिक भाविकांसोबत पर्यटकही येतात. तुम्ही लहान मुलांना येथे आवर्जून घेऊन जा.

Jalgaon Trip
Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com