Jaggery vs Honey: गूळ की मध? वजन कमी करण्यासाठी कोणता आहे योग्य पर्याय?

Jaggery vs Honey: वजन कमी करताना साखरेसाठी पर्याय म्हणून गूळ किंवा मधाचा यामध्ये समावेश होतो. मात्र या दोघांपैकी नेमकं कोणाचं सेवन केलं पाहिजे हे जाणून घेऊया.
Jaggery vs Honey
Jaggery vs Honeysaam tv
Published On

चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे आजकाल वजन वाढीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतेय. त्यामुळे अनेक जणं वजन कमी करण्याच्या मागे लागतात. साखरेमुळे वजनात वाढ होते हे अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेकजण साखर सोडण्याचा विचार करतात. अशावेळी साखरेसाठी पर्याय म्हणून गूळ किंवा मधाचा यामध्ये समावेश होतो.

मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर मध की गूळ काय योग्य आहे ते माहितीये का? आजच्या या लेखातून आपण हेच जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला वजन कमी करणं फायदेशीर ठरणार आहे.

Jaggery vs Honey
Reduce Cholesterol: शरीरातील रक्तवाहिन्यांना ब्लॉक करतं LDL कोलेस्ट्रॉल; नसांना पूर्ण साफ करतील 'हे' काळे पदार्थ

गुळामध्ये असलेले पोषक घटक

गूळ हा कच्च्या साखरेचा एक प्रकार मानला जातो. गूळ हे उसाच्या किंवा ताडाच्या रसापासून बनवला जातो. त्यात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांसारखे पोषक घटक आढळून येतात. जर तुम्ही साखरेऐवजी गूळाचा समावेश करत असाल तर हा एक योग्य पर्याय मानला जातो. 100 ग्रॅम गुळात 383 कॅलरीज, 98.5 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 0.4 ग्रॅम प्रोटीम असतात.

मधामध्ये असलेले पोषक घटक

मध हे एक नॅचरल स्विटनर म्हणून ओळखलं जातं. हे पदार्थाला गोडवा देत असून त्यामध्ये जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. 100 ग्रॅम मधामध्ये 304 कॅलरीज, 82 ग्रॅम कर्बोदके आणि 0.3 ग्रॅम प्रोटीन असतं. मधामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फिनॉलिक्ससह अँटिऑक्सिडंट असतात जे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचं समोर आलं आहे.

वजन कमी करण्यासाठी काय अधिक योग्य?

आता सर्वांच्या मनात प्रश्न असा आहे की, वजन कमी करण्यासाठी या दोघांपैकी नक्की कशाचं सेवन केलं पाहिजे. कॅलरीजचं प्रमाण पाहिलं तर मधामध्ये कमी कॅलरीज आहे. त्यामुळे याचा वापर तुम्ही ओट्स, दही, स्मूदी यांच्यासांरख्या पदार्थांमध्ये करू शकता. दुसरीकडे गूळामध्ये मधाच्या तुलनेत कॅलरीजचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे याचा वापर तुम्ही घरात मिठाई बनवण्यासाठी करू शकता.

मधुमेही रूग्णांनी कशाचं सेवन केलं पाहिजे?

मध आणि गूळ या दोन्ही गोष्टींच्या सेवनाने ब्लड शुगर लेवल वाढवतात. मात्र दोन्हीपैकी एका पर्यायाची निवड करायची असल्यास तज्ज्ञ मध सेवन करण्याचा सल्ला देतात. गुळामध्ये मॅग्नेशियम, तांबे आणि लोह भरपूर असतं तर मधामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर असतं, जे गुळापेक्षा जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे एकंदरीत गुळापेक्षा मधाचे सेवन करणं अधिक फायदेशीर आहे.

Jaggery vs Honey
Stomach Cancer: पोटाच्या कॅन्सरपूर्वी महिलांच्या शरीरात दिसतात 'हे' बदल; अजिबात दुर्लक्ष करू नका

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com