Hot Shower effect: थंडीत गरम पाण्याने आंघोळ करणे पडू शकतं महागात; वेळीच सावध व्हा

Hot Shower effect in Winter in Marathi: बहुतांश लोक आंघोळीसाठी गरम पाणी वापरतात. अनेक लोकांना गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. मात्र, हिवाळ्यात कडक गरम पाण्याने आंघोळ करण्याचे काही दुष्पपरिणाम देखील आहे.
Hot Shower effect in Winter
Hot Shower effect in WinterSaam tv
Published On

Hot Shower effect in Winter:

हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे अनेकांसाठी एक मोठं आव्हानच असतं. यामुळे बहुतांश लोक आंघोळीसाठी गरम पाणी वापरतात. अनेक लोकांना गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. मात्र, हिवाळ्यात कडक गरम पाण्याने आंघोळ करण्याचे काही दुष्पपरिणाम देखील आहे. (Latest Marathi News)

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करत असाल, तर आरोग्यासाठी धोकादायक आहे. कडक गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीरावर त्याचे परिणाम होतात.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गरम पाण्यामुळे 'केराटिन स्किन सेल्स'चं नुकसान होतं. यामुळे त्वचेवर खाज येणे, त्वचेवर कोरडेपणा येणे आणि पुरळ उठण्याच्या समस्येला सामोरे जावं लागतं. त्यामुळे तज्ज्ञांकडून हिवाळ्यात कोमट गरम पाण्यात आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो.

Hot Shower effect in Winter
Woolen Clothes : थर्मलपासून लोकरीपर्यंतचे कपडे धुताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर

हिवाळ्यात कडक गरम पाण्याने आंघोळ केल्याने अंगात सुस्ती कायम राहते. कडक गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील आळसपणा कायम राहतो. तसेच माणसाची झोपही जात नाही. त्याचा दिवसभराच्या उर्जेवरही परिणाम होतो. यामुळे केसाचेही नुकसान होते.

जास्त कपडे घालू नये

हिवाळ्यात शरीरार उबदार ठेवण्यासाठी अंगात अधिक हिट निर्माण करणारे कपडे घालणे टाळले पाहिजे. व्यक्तीला थंडी वाजू लागली तर शरीरात 'इम्यून सिस्टम व्हाइट ब्लड सेल्स' तयार होतात. ते सेल्समुळे एखाद्या रोगापासून बचाव करण्यास मदत होते. अशात शरीरात अधिक हिट असेल तर आपलं 'इम्यून' व्यवस्थित काम करत नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hot Shower effect in Winter
Baby Bath In Winter : लहान मुलांना थंडीत आंघोळ घालताय? कशी घ्याल काळजी?

गरम पाण्यात कपडे कधीही धुवू नका

हिवाळ्यात काही लोक लोकरीचे कपडे गरम पाण्याने धुतात. मात्र ते वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचं आहे. कारण गरम पाण्याने शाल आणि स्वेटर धुतल्याने त्यातील उष्णता कमी होते. तसेच ते खराब होण्याची शक्यता असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com