Solar Fan : उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा त्रास खूप होतो त्यामुळे गर्मी पासून दिलासा मिळवण्यासाठी पंखा, कुलर, एसी यांचा वापर आपण करतो. उन्हाळ्यात यांचा वापर अधिक वाढल्याने विजबील वाढते.
उन्हाळ्यात वीज खंडीत सारखी होत असल्याने गर्मीने हालत खुप खराब होऊन जाते. म्हणून तुमच्या या समस्येवर एक उपाय आपण पाहूयात. खर तर आपण सोलर फॅन बदल बोलत आहोत.
याचा वापर केल्याने विजबील येणार नाही तसेच वीज खंडित झाली तरी तुम्ही फॅन चालवू शकता. उन्हाळ्यात या फॅनचा वापर करणे हा एक उत्तम पर्याय आहे चला तर मग जाणून घेऊ याविषयी पूर्ण माहिती.
D.light SF20 सोलर रीचाजर्बेल फॅन -
या फॅनचा वापर 8 तास करता येतो.तेही फक्त एका चार्जवर शक्य आहे. हा पंखा उन्हाळ्यात नुस्ती थंडगार (Cold) हवाच नाही तर घरातील किडे आणि माश्या दूर पळवतात. संपूर्ण खोली थंडगार करण्यासाठी हा फॅन उत्तम आहे.वीज खंडित झाली तरी याचा वापर करून गर्मीपासून दिलासा मिळवू शकतो.
d.light SF20 सोलर रीचाजर्बेल फॅन मध्ये LED लाइट इन-बिल्ड असते. त्यामुळे वीज खंडीत झाली तरी हा फॅन वापरता येतो.या फॅन सोबत 16W चे मजबूत सोलर पॅनल असते.कमीतकमी मेंनटेंनेन्स सोबत हा फॅन 5 वर्ष टिकला पाहिजे. ऑनलाईन स्टोरवरून हा फॅन विकत घेऊ शकता त्यावर या फॅनची किंमत 4,195 रुपय आहे आणि 1 वर्षाची (Years) वॉरंटी मिळणार आहे.
Lovely सोलर फॅन – DC 12 volt -
व्होल्ट करंट वर काम करणारा हा टेबल फॅन 24 वॉल्ट मजबूत मोटर सोबत येतो. या फॅनचे डिझाईन खूप स्टायलिश आहे. लोखंड आणि पीव्हीसी मटेरियल पासून हा फॅन बनवला गेला. तुम्हाला हा फॅन आकाशी आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध होईल. फिल्पकर्ड वर हा फॅन 1,449 रुपयांत खरेदी करता येईल आणि सोबतच 6 महिन्याची वॉरंटी देतील.
Zosoe पावरफूल 1.88 watts रीचाजर्बेल टेबल फॅन -
उन्हाळ्यात वीज खंडीत झाल्यावर या फॅनचा वापर करून तुम्ही गर्मी पासून शांतता मिळवू शकता. वीज खंडित झाल्याने AC आणि DC मध्ये काम करते. एका वेळेस लाईट आणि फॅन दोन्ही काम करते.
जर तुम्ही दोन्हीही एकाच वेळेस वापरत असाल तर ते तीन तासापर्यंत काम करू शकते. फक्त एलईडी लॅम्प चा वापर केल्याने आठ तासापर्यंत करता येईल आणि पंख्याचा वापर 4 तासासाठी करता येईल. तुम्ही हा फॅन ऑनलाईन स्टोअर वरून खरेदी करू शकता याची किंमत 899 रुपये आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.