Technology News : आजच्या काळामध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. ज्यामध्ये अप्रतिम फीचर्स आणि डिझाईन दिले आहे. अशातच बऱ्याचदा अनेक फोन दोन सिम सपोर्ट सोबत येतात. पण आज आम्ही तुम्हाला अशाच स्मार्टफोन बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला तीन तीन सिम भेटणार आहेत. हो तुम्ही बरोबर वाचलं तुम्हाला ट्रिपल सिम सपोर्ट सोबत फोन भेटणार आहे.
सोबतच तुम्हाला कॅमेरा कॉलेटी एकदम झकास भेटणार आहे. या फोनचे (Phone) नाव kechaoda k112 आहे जो ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 2.4 इंचचा QVGA डिस्प्ले, 0.3 मेगापिक्सलचा रियल कॅमेरा आहे. 3600mAH ची लिथियम आयन बॅटरी दिली आहे.
सोबतच यामध्ये ट्रिपल सिम सिस्टम मिळत आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या फोनमध्ये एक नाही दोन नाहीतर तीन सिम वापरू शकता. सोबतच फोनच्या स्टोरेज (Storage) बद्दल सांगायचं झालं तर 32mb चा ram आणि 64mb चे स्टोरेज दिले गेले आहे. याचे स्टोरेज तुम्ही 32gb एवढे वाढवू शकता. यासाठी डेडिकेटेड मायक्रो एसडीकार्ड दिले गेले आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी हे फीचर आहे उपलब्ध -
Kechaoda k112 च्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झाले तर, 2G नेटवर्क आणि GSM SIM सपोर्ट मिळते. याशिवाय यामध्ये ब्लूटूथ आणि 3.5mm चा हेडफोन जॅक सुद्धा दिला गेला आहे. त्यासोबतच फोन मध्ये अल्फान्यूमेरिक कीबोर्ड, मल्टी लँग्वेज सपोर्ट, एफ एम रेडिओ आणि म्युझिकसाठी उत्तम स्पीकर सुद्धा दिला आहे.
Kechaoda k112 ची किमत -
तुम्ही फक्त 1699 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट या ॲपवरून हा फोन खरेदी करू शकता. या फोनच्या खरेदीवर तुम्हाला कॅशबॅक डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. फ्लिपकार्ट किंवा ॲक्सिस बँक कार्डने तुम्ही फोन खरेदी करत असाल तर तुम्हाला पाच टक्के कॅशबॅक मिळू शकतो. या फोन वरती सात दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी, कॅश ऑन डिलिव्हरी आणि एका वर्षाची मॅन्युफॅक्चर वॉरंटी मिळते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.