5G Smartphone: 5G चा बोलबाला! १० हजारांपेक्षा कमी किमतीत लवकरच लॉन्च होणार स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स

Itel Smartphone : बाजारात लवकरच दहा हजारांपेक्षा कमी किंमत असलेला भारतात अजून एक 5G फोन लाँच होणार आहे.
Itel Smartphone
Itel SmartphoneSaam Tv
Published On

Itel P55 5G Smartphone

स्मार्टफोन ही काळाची गरज आहे. आजकाल सगळ्यांकडेच स्मार्टफोन असतात. बाजारात 5G नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर अनेक 5G फोन लाँच झाले आहेत. परंतु आता लवकरच दहा हजारांपेक्षा कमी किंमत असलेला भारतात अजून एक 5G फोन लाँच होणार आहे.

बाजारात अनेक 5G फोन लाँच झाले आहेत. परंतु एकाही स्मार्टफोनची किंमत दहा हजारांपेक्षा कमी नाही. पण या नवीन फोनची किंमत १० हजारांपेक्षा कमी असणार आहे. itel कंपनी बाजारात हा फोन लवकरच लाँच करणार आहे. कंपनीकडून या फोनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. itel चा हा पहिला 5G फोन असेन.

Itel Smartphone
Gauri Ganpati 2023: गौराईला तिखटाचा नैवद्य का दाखवतात माहितीये का?

आयटेल कंपनीच्या या फोनची किंमत अद्याप समोर आली नाही. परंतु फोनची साधारण किंमत १० हजारांपेक्षा कमी असेल. कंपनीचे म्हणणे आहे, की इतक्या कमी किंमतीतला हा पहिला 5G फोन असेल. हा एक पावरफुल आणि बजेट फ्रेंडली फोन असणार आहे असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीला हा फोन बाजारात लाँच करुन मार्केटमध्ये नवीन ओळख निर्माण करायची आहे.

कधी होणार लाँच

itel P55 5G हा स्मार्टफोन 26 सप्टेंबरला लाँच होऊ शकतो. कंपनीने टीझर पेज अॅमेझॉनवर लाईव्ह केले आहे. हा फोन अॅमेझॉनवर उपलब्ध असेल. यामध्ये MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. कंपनीने फोनचा एक टीझर फोटो शेअर केला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर मिळेल. कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, यामध्ये फक्त एंट्री लेव्हल फिचर्स उपलब्ध असतील. ज्यांना आपल्या बजेटमध्ये हँडसेट हवा असेल तर हा उत्तम पर्याय आहे.

Itel Smartphone
BSNL Plan: BSNL चे दोन नवे जबरदस्त प्लान! कमी पैशांत मिळणार १८० दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरेच काही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com