Skin care : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? तज्ज्ञांच्या या सवयी ठरतील उपयोगी

Winter dry skin experts tips: हिवाळ्याची चाहूल लागताच त्वचेच्या समस्या सुरू होतात. थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो, ज्यामुळे त्वचा कोरडी, रुक्ष आणि भेगाळलेली होते. अनेकदा साधे मॉइश्चरायझर लावूनही फरक पडत नाही.
Skin Care Tips
Skin Care Tips Saam TV
Published On

हिवाळा सुरु झाला की थंड वातावरणामुळे त्वचेचा कोरडेपणा, खाज सुटणं, ओठ फाटणं आणि चेहऱ्यावरील निस्तेजपणा अशी अनेक त्वचासंबंधी समस्यांमध्ये वाढ होते. तापमान घटल्याने हवेतील आर्द्रता कमी होते आणि त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. थंड हवामानामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढून त्वचा निस्तेज दिसू लागते आणि त्वचेची जळजळ होते.

मुंबईमधील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे म्हणाले, बऱ्याच व्यक्ती हिवाळ्यात त्वचेची योग्य ती काळजी घेत नाही आणि त्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याऐवजी ती समस्या आणखी वाढते. हिवाळ्यात त्वचेची जास्तीत जास्त काळजी घेणे आणि त्वचेसंबंधी समस्या टाळणे ही काळाची गरज आहे.

हिवाळ्यात तापमानात झालेली घट, कमी झालेली आर्द्रता आणि हीटरचा वापर यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो, ज्यामुळे त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे आणि त्वचा संवेदनशील होते तसेच अॅलर्जी आणि संसर्गाचा धोका वाढतो. योग्य काळजी घेतल्यास त्वचेचे दीर्घकालीन नुकसान टाळता येते आणि थंडीच्या महिन्यांत तुमची त्वचा निरोगी, मऊ आणि चमकदार राहते.

Skin Care Tips
Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

हिवाळ्यात या चुका करू नका

गरम पाण्याचा वापर आणि जास्त वेळ आंघोळ करणं

थंडीत गरम पाण्याने जास्त वेळ आंघोळ केल्यास आराम मिळतो, परंतु यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जातं. ज्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्वचेला खाज सुटते. अशावेळी कोमट पाण्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा आणि जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा.

Skin Care Tips
Early symptoms of brain cancer: मेंदूचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात सुरुवातीला होतात ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं

सनस्क्रीनचा वापर न करणं

बऱ्याच व्यक्तींना असे वाटते की सनस्क्रीन हे केवळ उन्हाळ्यासाठी असते आणि त्यामुळे हिवाळ्यात त्याचा वापर टाळला जातो. मात्र , ही सर्वात मोठी चूक असून हिवाळ्यातही अतिनील किरणं त्वचेच्या आत प्रवेश करतात ज्यामुळे त्वचा भाजली जाते(टॅनिंग), अकाली वृद्धत्व येते. म्हणूनच एसपीएफ 50 सनस्क्रीन वापरुन त्वचेचे रक्षण करा.

वारंवार तोंड धुणं

दिवसातून अनेक वेळा त्वचा फेस वॉश अथवा साबणाने धुतल्यास त्वचेवरील संरक्षणात्मक तेल निघुन जाते आणि त्वचेचा कोरडेपणा वाढू शकतो. या दिवयात सौम्य, हायड्रेटिंग क्लींजरचा वापर करणे योग्य राहिल. तज्ञांचा सल्ल्याशिवाय कोणतेही उत्पादन वापरणे टाळा.

Skin Care Tips
Stomach cancer: महिलांमध्ये लपलेली असतात पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास जीव वाचेल

जास्त प्रमाणात क्रिम वापरणं टाळा

क्रीम्सचा जाड थर त्वचेवर लावल्यास त्वचेवरील छिद्र बंद होऊन मुरुमे आणि पुरळ येऊ शकतात. म्हणून, डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रीम्सचा वापर करा.

Skin Care Tips
Rising cancer cases: अनहेल्दी लाइफस्टाइल ठरतेय जबाबदार; भारतात २० टक्क्यांपेक्षा जास्त तरूण कॅन्सरग्रस्त

ओठ आणि हातांची काळजी

ओठ आणि हातांच्या काळजीकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. ज्यामुळे ओठ फाटणे, ओठ कोरडे पडून त्यावर चिरा पडतात म्हणून लिप बाम लावणे गरजेचे आहे. या टिप्स फॉलो करा आणि त्वचेची पुरेपुर काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com