Smartphone Heating : तुमचा फोन सतत गरम होतोय ? या 3 सवयी आत्ताच सोडा, अन्यथा...

Smartphone Heating Problem : स्मार्टफोन गरम होण्याची समस्या सामान्य आहे.
Smartphone Heating
Smartphone HeatingSaam Tv
Published On

Smartphone Heating Solution : स्मार्टफोन गरम होण्याची समस्या सामान्य आहे. अनेक वेळा चार्जिंग आणि गेमिंग दरम्यान फोन गरम होतो. पण फोन पुन्हा पुन्हा गरम होण्याची समस्या येत असेल तर तुम्ही सतर्क राहायला हवे.

कधीकधी उन्हाळ्यात गरम होण्याची समस्या (Problem) सामान्य होते. जर तुमच्या स्मार्टफोनला वारंवार गरम होण्याच्या समस्या येत असतील तर तुम्ही काही सवयी सोडल्या पाहिजेत.

Smartphone Heating
Smartphone side effects : मोबाइल उशाशी ठेवून झोपण्याच्या सवयीमुळं कॅन्सरचा धोका? तज्ज्ञांकडून गंभीर इशारा

फोनला सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा

स्मार्टफोन चालू असतानाही गरम होतो. अशा परिस्थितीत स्मार्टफोन (Smartphone) थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये. कारण सूर्याच्या संपर्कामुळे स्मार्टफोनचे तापमान पूर्वीपेक्षा आणखीन वाढते. अशा स्थितीत फोन हॅंग होतो. काही प्रकरणांमध्ये, फोन कायमचा खराब होऊ शकतो. जेव्हा तुम्ही फोन चार्जिंगमध्ये ठेवता तेव्हा तो उन्हात ठेवू नका.

कव्हर वापरणे

स्मार्टफोनसाठी कव्हर वापरणे बऱ्याच बाबतीत चांगले आहे. कव्हर वापरल्यामुळे स्मार्टफोनचे नुकसान होण्यापासून वाचतो, पण फोन गरम त्यामुळे गरम होतो. अशा वेळी कव्हर काढून टाकणे चांगले. अनेक वेळा असे केल्याने स्मार्टफोन गरम होण्याची समस्या संपते.

Smartphone Heating
Smartphones Harmful To Bones: तुमचा लाडका स्मार्टफोन या गंभीर आजारांना देतो निमंत्रण

गेमिंग टाळा

उन्हाळ्यात फोनवर खूप हेवी असलेले गेम खेळणे टाळावे. त्याचप्रमाणे जर तुम्ही बजेट (Budget) स्मार्टफोनवर गेमिंग करत असाल तर ते अधिक धोकादायक ठरू शकते. कारण बजेट स्मार्टफोन हेवी गेमिंगसाठी बनवले जात नाहीत. यामध्ये कूलिंग पॅडचा वापर केला जात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com