Urine Output Test: तुमची किडणी धोक्यात तर नाही ना? जाणून घेण्यासाठी वापरा 'ही' सोपी ट्रिक, युरोलॉजिस्टनी सांगितला प्रभावी उपाय

Kidney Function Check: युरोलॉजिस्ट डॉ. परवेज यांनी घरच्या घरी किडनीचं आरोग्य तपासण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगितली आहे. या उपायाने लघवी तपासून किडनीची कार्यक्षमता ओळखता येते.
Urine Output Test
kidney healthsaam tv
Published On
Summary

किडनीचे कार्य योग्य रित्या चालू आहे का नाही हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता.

घरच्या घरी युरिन आउटपुट मोजून किडनीचं कार्य ओळखता येऊ शकतं.

कोणतीही शंका किंवा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

किडनी हा आपल्या शरीरातील महत्वाचा भाग मानला जातो. किडनी तिचे काम योग्यरित्या करतेय की नाही, हे कोणत्याही चाचणीशिवाय ओळखता येऊ शकतं का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. पुढे सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या युरोलॉजिस्ट डॉ. परवेज यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी एक अतिशय सोपी ट्रिक सांगितली आहे. ज्यामुळे तुम्ही घरी बसूनच तुमच्या किडनीचं आरोग्य तपासू शकता.

Urine Output Test
Fatty Liver: भूक कमी, थकवा अन् अपचनाचा त्रास जाणवतोय? असू शकतो फॅटी लिव्हरचा धोका; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

डॉ. परवेज यांच्या मते, किडनीचं आरोग्य जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 'युरिन आउटपुट' तपासणे. त्यांनी स्पष्ट केलं की, सामान्यतः व्यक्तीचं युरिन आउटपुट हे प्रती किलो वजनावर ताशी ०.५ ते १ एमएल असतं. याचा अर्थ काय? उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचं वजन ५० किलो असेल, तर त्याचं ताशी सुमारे ५० एमएल मूत्रविसर्जन होणं आवश्यक आहे. याने तुमच्या किडनीचे कार्य ओळखायला मदत होते.

स्वतःचं युरिन आउटपुट कसं मोजायचं?

बऱ्याच जणांना शंका येते की,स्वतःची लघवी कशी मोजायची? यावर तज्ज्ञ म्हणतात, तुमचं युरिन आउटपुट किमान १० तासांसाठी मोजा. ५० किलो वजनाच्या व्यक्तीचं १० तासांत साधारण ५०० एमएल युरिन आउटपुट असावं. तुम्ही एक लिटरची बिसलेरी बाटली घेऊ शकता आणि त्याच्या साहाय्याने युरिन आउटपुट मोजू शकता.

जर तुमचं युरिन आउटपुट पुरेसं असेल, तर याचा अर्थ तुमची किडनी पूर्णपणे व्यवस्थित कार्य करते. या साध्या पद्धतीने तुम्ही किडनीचं कार्य नीट सुरू आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.

टीप: ही माहिती केवळ जागरूकतेसाठी आहे. कोणत्याही आरोग्य समस्येसाठी किंवा शंका असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Urine Output Test
Cancer Symptoms: सावधान! झोपल्यावर प्रचंड घाम येतोय?असू शकतं कॅन्सरचं लक्षण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com