Fatty Liver: भूक कमी, थकवा अन् अपचनाचा त्रास जाणवतोय? असू शकतो फॅटी लिव्हरचा धोका; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Liver Health: बदलत्या जीवनशैलीमुळे फॅटी लिव्हरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तज्ज्ञांनी घरबसल्या फॅटी लिव्हर ओळखण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.
fatty liver symptoms
fatty liver test at homesaam tv
Published On
Summary

फॅटी लिव्हर फक्त दारू पिणाऱ्यांमध्येच नाही तर सर्वसामान्यांमध्येही वाढताना आढळला आहे.

पोटाभोवती फॅट वाढणे हे फॅटी लिव्हरचे प्राथमिक संकेत असू शकतात.

थकवा, अपचन, भूक न लागणे, पिवळे डोळे ही लक्षणे लिव्हर कमजोर होण्याची आहेत.

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे चुकीचा आहार आणि वाढत्या लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हर हा आजार झपाट्याने वाढताना दिसतो. पूर्वी ही समस्या दारू पिणाऱ्यांमध्ये दिसून यायची. मात्र आता ती नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) म्हणून सामान्य लोकांमध्येही वाढत चालली आहे.

फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये असणारी चर्बी किंवा चरबीचे प्रमाण जास्त वाढणे. यामुळे लिव्हरचे कार्य हळूहळू कमी होते आणि त्याचा परिणाम गंभीर आजारांवर होऊ शकतो. मात्र अनेकांना असा प्रश्न पडतो की, फॅटी लिव्हरची ओळख घरबसल्या करता येते का? याचे उत्तर प्रसिद्ध लिव्हर रोग तज्ज्ञ डॉ. एस. के. सरीन यांनी दिले आहे. त्यांनी काही सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत. ज्यांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी प्राथमिक लक्षणांवरून अंदाज बांधू शकता.

fatty liver symptoms
Cancer Symptoms: सावधान! झोपल्यावर प्रचंड घाम येतोय?असू शकतं कॅन्सरचं लक्षण

डॉ. सरीन यांच्या मते, जर पुरुषांची कंबर ९० सेंमीपेक्षा जास्त आणि महिलांची ८० सेंमीपेक्षा जास्त असेल, तर फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. पोटाभोवती जास्त चरबी जमा होणे हे लिव्हरसाठी हानिकारक ठरते. त्याचप्रमाणे खूप थकवा येणे, पोटाच्या वरच्या भागात जडपणा किंवा हलका त्रास जाणवणे, हे देखील लिव्हर व्यवस्थित काम करत नसल्याचे संकेत असू शकतात. लिव्हर कमजोर झाल्यास भूक कमी होणे, अपचन, किंवा जेवल्यानंतर पोट फुगणे अशा समस्या जाणवतात.

जर त्वचा आणि डोळे पिवळसर दिसू लागले, तर हे लिव्हरमध्ये सूज येण्याचे किंवा सिरोसिस होण्याचे लक्षण आहे. कारण अशा स्थितीत शरीरात बिलीरुबिनचे प्रमाण वाढते. अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला घेऊन SGPT आणि SGOT सारखे लिव्हर एन्झाइम टेस्ट किंवा अल्ट्रासाऊंड तपासणी करून घ्या. यामुळे लिव्हरमध्ये चर्बी साचली आहे का हे निश्चित करता येते.

fatty liver symptoms
Liver Failure: कमी झोप अन् सतत थकवा जाणवतोय? असू शकतात लिव्हर फेल्युअरची लक्षणे, वाचा संपूर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com