PCOD Yoga: PCOD ची समस्या आहे? आपल्या दैनंदिन जीवनात 'या' योगासनांचा समावेश करा

Hormonal Balance: पीसीओडी किंवा पीसीओएसच्या त्रासातून आराम मिळवण्यासाठी काही योगासने उपयुक्त ठरू शकतात. जाणून घ्या लक्षणे कमी करणारी काही प्रभावी आणि फायदेशीर योगासने.
PCOD Yoga
PCOD Yogafreepik
Published On

PCOS आणि PCOD हे महिलांच्या अंडाशयाशी संबंधित सामान्य विकार आहेत, जे आजकाल खूप प्रमाणात दिसून येतात. हार्मोनल असंतुलनामुळे मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे आणि चेहऱ्यावर अवांछित केस येणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. या स्थितीचा प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. वजन नियंत्रण, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि ताण कमी करण्यासारख्या जीवनशैलीतील बदलांनी या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते.

योग हा हार्मोनल संतुलन सुधारण्याचा एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे. नियमित योगाभ्यास केल्याने ताण कमी होतो आणि शरीराचे आरोग्य सुधारते. काही विशिष्ट योगासने PCOD आणि PCOSच्या लक्षणांवर सकारात्मक परिणाम करतात आणि त्यांच्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत करतात. येथे काही उपयुक्त योगासने आहेत.

बद्ध

बद्ध कोनासन, ज्याला बटरफ्लाय पोज म्हणतात, पेल्विक क्षेत्रात रक्ताभिसरण सुधारते आणि प्रजनन आरोग्यास मदत करते. हे आसन अंडाशयांचे कार्य वाढवते आणि अनियमित मासिक पाळी सुधारण्यास उपयुक्त ठरते. सराव करताना पाठ सरळ ठेवा.

भुजंगासन

भुजंगासनाचा नियमित सराव महिलांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता दूर करण्यात, प्रजनन क्षमता वाढवण्यात आणि PCOS-PCOD समस्यांवर मदत करतो. हे पाठीचा कणा आणि पोटाचे स्नायू मजबूत करत असून पुनरुत्पादक अवयवांना सक्रिय करते.

सेतुबंधासन

सेतुबंधासन करताना पाठीवर झोपा, गुडघे वाका आणि पाय कंबरेजवळ ठेवा. हळूहळू कंबरे वर उचला आणि हातांनी आधार द्या. या आसनामुळे हार्मोनल संतुलन सुधारते, थायरॉईड-अंडाशयांचे कार्य वाढते आणि ताण कमी होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com