Health Insurance : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी; आरोग्य विम्यातून हटवली वयोमर्यादेची अट, जाणून घ्या नियम

Health Insurance update : आता ६५ वय ओलांडणाऱ्या व्यक्तीला विमा खरेदीची संधी मिळणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, आता कंपन्यांना आता सर्व वयोगटातील लोकांसाठी विमा उत्पादने तयार करावी लागणार आहेत.
Health Insurance : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी; आरोग्य विम्यातून हटवली वयोमर्यादेची अट, जाणून घ्या नियम
Health Insurance Saam Tv
Published On

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. इर्डाने (भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण) आरोग्य विम्यातील वयोमर्यादेची अट हटवली आहे. आरोग्य विम्यातील वयोमर्यादेची अट ही एक एप्रिलपासून हटविण्यात आली आहे. यामुळे आता ६५ वय ओलांडणाऱ्या व्यक्तीला आरोग्य विमा खरेदीची संधी मिळणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, आता कंपन्यांना आता सर्व वयोगटातील लोकांसाठी विमा उत्पादने तयार करावी लागणार आहेत.

परिपत्रकानुसार, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने भारतात आरोग्य व्यवस्था करण्याचा मानस आहे. तसेच कंपन्यांना त्यांच्या उत्पादनामध्ये विविधता आणण्यासाठी परिपत्रक जारी केलं आहे. यामुळे विमा कंपन्यांना विमाधारक ज्येष्ठ नागिराकांच्या तक्रारी प्राधान्याने पाहाव्या लागणार आहेत.

Health Insurance : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी; आरोग्य विम्यातून हटवली वयोमर्यादेची अट, जाणून घ्या नियम
Diabetes असल्यास आहारात अंडी खाणं आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घ्या

विमा नियामकाच्या परिपत्रकामुळे ६५ वय ओलांडणाऱ्या व्यक्तींना नवीन आरोग्य विमा खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या परिपत्रकानुसार, विमा कंपन्यांना कर्करोग, हृदय आणि एड्स सारख्या गंभीर आजारांच्या व्यक्तींना देखील विमा खरेदी करण्यास नकार देता येणार नाही. तसेच विम्याचा प्रतीक्षा अवधी (Insurance Waiting Period) देखील कमी करण्यात आला आहे. त्यामुळे ४८ महिन्यांचा कालावधी ३६ महिने केला आहे. या नव्या निर्देशानुसार, 36 महिन्यांनंतर आधीच अस्तित्वात असलेल्या अटींच्या आधारे दावे नाकारण्यास प्रतिबंधित केले आहे.

Health Insurance : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी; आरोग्य विम्यातून हटवली वयोमर्यादेची अट, जाणून घ्या नियम
Indian Railways Rules : ट्रेनने प्रवास करताना या चुका कधीच करू नका; जाणून घ्या भारतीय रेल्वेचे नियम

तत्पूर्वी, आरोग्य विम्यातील वयोमर्यादेची अट काढून टाकल्याने विमा खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. विमा प्राधिकरणाने सर्व वयोगटांचा विचार करून विमा कंपन्यांना उत्पादने करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विमा कंपन्या ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मुले आदी वर्गातील लोकांसाठी विमा पॉलिसी तयार कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या विम्यासंबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक चॅनेल निर्माण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com