Uttarakhand Tour Package: IRCTC चा जबरदस्त टूर पॅकेज! उन्हाळ्याच्या सुट्टीत स्वस्तात मस्त भेट द्या तीर्थक्षेत्रांना, बुकिंग खर्च पाहा

Uttarakhand IRCTC Tour Package (April 2024): उन्हाळ्याची सुट्टी लागली की, आपल्यापैकी अनेकांना बाहेर फिरण्याचे वेध लागतात. शाळा-कॉलेजला सुट्टी लागल्यामुळे अनेकांना फिरण्याची आवडते तर काहींना ट्रेकिंगला. यासाठी आपण ट्रिपचा प्लान करतो.
Summer Vacation Plan, IRCTC Tour Package
Summer Vacation Plan, IRCTC Tour PackageSaam Tv

Summer IRCTC Tour Package:

उन्हाळ्याची सुट्टी लागली की, आपल्यापैकी अनेकांना बाहेर फिरण्याचे वेध लागतात. शाळा-कॉलेजला सुट्टी लागल्यामुळे अनेकांना फिरण्याची आवडते तर काहींना ट्रेकिंगला. यासाठी आपण ट्रिपचा प्लान करतो.

यंदाच्या एप्रिल महिन्यात तुम्हाला फिरायचे असेल तर IRCTC ने भन्नाट टूर प्लान आणला आहे. यामध्ये तुम्हाला अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देता येईल. या टूर पॅकेजमध्ये (Package) तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत देवदर्शनाचा प्लान करु शकता. जाणून घेऊया टूर (Tour) प्लानबद्दल सविस्तर

Summer Vacation Plan, IRCTC Tour Package
Traval Tips in Marathi : कौटुंबिक सहलीला जाताय? या चुका करू नका

पॅकेजचे नाव - "मानखंड एक्सप्रेस - भारत गौरव टुरिस्ट ट्रेन"

पॅकेज कालावधी - 10 दिवस आणि 11 रात्री

टूर पॅकेज तारीख - २२ एप्रिल

प्रवास कुठून सुरु होईल? - पुणे - खातिमा - टनकपूर - पुणे

प्रवास मोड - भारत गौरव टुरिस्ट ट्रेन

1. टूर पॅकेजमध्ये कोणत्या सुविधा मिळतील?

या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला राउंड ट्रिप ट्रेनचे तिकीट, बसची सुविधा, हॉटेलमध्ये राहण्याची सोय तसेच गाइड आणि विमा मिळेल.

2. फिरण्याची ठिकाणे

आयआरसीटीसीच्या या टूर प्लानमध्ये तुम्हाला

  • टनकपूर - पूर्णागिरी, शारदा नदी घाट

  • चंपावत/लोहाघाट या ठिकाणी संध्याकाळची आरती आणि भजन - बालेश्वर, चहाचे बाग, मायावती आश्रम, हात कालिका मंदिर, पाताल भुवनेश्वर, जागेश्वर धाम

  • गोलू देवता - चिताई, नंदा देवी,

  • कैंची धाम - बाबा नीम करोली मंदिर

  • कासार देवी आणि कातरमल सूर्य मंदिर

  • नानकमत्ता गुरुद्वारा - खातिमा

  • नैना देवी- नैनिताल

या तीर्थक्षेत्रांना भेट देता येईल.

Summer Vacation Plan, IRCTC Tour Package
April Travel Destination : उन्हाळ्यात फिरा निसर्गरम्य पर्यटनस्थळी, या भन्नाट ठिकाणांना नक्की भेट द्या

3. बुकिंग खर्च किती?

  • जर तुम्ही स्टॅर्डड कॅटेगरीमधून जास्त असाल तर प्रति व्यक्तीसाठी २८,०२० रुपये भरावे लागतील. जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर तुम्हाला प्रति व्यक्तीसाठी २८,०२० रुपये भरावे लागणार आहे.

  • तुम्ही डिलक्स कॅटेगरीमधून फॅमिली ट्रिपसाठी जात असाल तर प्रति व्यक्तीसाठी ३५,३४० रुपये मोजावे लागतील.

Summer Vacation Plan, IRCTC Tour Package
South India Travel : दक्षिण भारतातील मिनी गोव्यात फिरायला जाताय? ही पर्यटनस्थळे आहेत नयनरम्य!

4. बोर्डिंग / डिबोर्डिंग स्टेशन्स

पुणे, एल ओनावला, पनवेल, कल्याण, नाशिक, जळगावएन, भुसावळ, कांडवा, इटारसी आणि राणी कमलापती.

5. कसे कराल बुक?

पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. याशिवाय तुम्हाला IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com