Apple New Update : Apple चं नवीन अपडेट व्हर्जन, अनेक वैशिष्ट्यांसह घेणार आरोग्याची काळजी

Apple iOS17 : अॅपलने आयफोनमध्ये नवीन अपडेट लाँच केले आहे.
Apple New Update
Apple New UpdateSaam Tv
Published On

Apple iOS17 Update

अॅपलने नुकताच भारतात आयफोन १५ लाँच केला आहे. आयफोनची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत आहे. आयफोनची विक्री सुरू झाली असून स्टोअरच्या बाहेर लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहे. यातच अॅपलने आयफोनमध्ये नवीन अपडेट लाँच केले आहे. हे फिचर तुम्हाला सर्व कामांसाठी मदत करेन.

नवीन मॉडेलसह नवीन अपडेटदेखील करण्यात आले आहे. आयफोनचे iOS17 नुकतेच जारी केले आहे. हे अपडेट iPhone XR, iPhone XS आणि त्याच्या नंतरच्या सर्व मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत. या अपडेटचे काही फिचर्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Apple New Update
Bank Holidays In October 2023 : ऑक्टोबरमध्ये ९ दिवस बँकाना सुट्ट्या; आरबीआयची यादी जाहीर; जाणून घ्या कोणत्या दिवशी राहणार बँका बंद

1. स्टँडबाय मोडसह तुमच्या आयफोनला स्मार्ट डिस्प्लेमध्ये बदला

स्टँडबाय मोड तुमच्या फोनला स्मार्ट डिस्प्लेमध्ये बदलते. यामध्ये तुमचा फोन वेळ, हवामान अशा बऱ्याच गोष्टी दाखवतो. तुमचा फोन चार्जवर असताना, लॉक केलेला असताना किंवा आडवा ठेवल्यास तो आपोआप सुरू होतो. यामध्ये तुम्ही Widgets, फेस असे अनेक बदल करु शकता.

2. ऑटोकरेक्टमुळे आयफोनमध्ये टायपिंग करणे सोपे

ऑटोकरेक्टमुळे अनेक फायदे होतात. एखादा शब्द चुकला तर ऑटोकरेक्टमुळे तो दुरुस्त होते. टायपिंग करताना विविध शब्दांचे सूचना दिल्या जातात. तसेच तुम्ही काय वाक्य टाइप करणार आहात हेदेखील आधीच्या शब्दांवरुन समजते अन् त्यामुळे वाक्य पूर्ण करण्यास मदत होते.

3. मेसेज स्टिकर्स वापरुन संवाद साधा

iOS17मध्ये मेसेजमध्ये स्ट्रिकर्स ड्रॉवर जोडला गेला आहे. यात अनेक लाइव्ह स्टिकर्स, इमोजी सर्वकाही एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच ज्या ठिकाणाहून तुम्ही इमोजी वापरत होता त्याच ठिकाणी तुम्हाला लाइव स्टिकर्सदेखील मिळतील. या अपडेटमध्ये मार्कअप वापरुन तुम्ही तुमचे फोटो, स्क्रिनशॉट वापरुन स्टिकर्स बनवू शकता. तसेच तुम्ही अॅनिमेटेड स्टिकर्सदेखील तयार करु शकतात.

4. सिरीला 'hey'म्हणण्याची गरज नाही

नवीन अपडेटमध्ये तुम्ही फक्त 'Siri' बोलून काम करु शकतात. किंवा सिरीला काहीही विचारु शकतात.

5. तुमच्या कॉलला नवीन पोस्टर्स देऊ शकता

iOS17 सह तुम्ही तुमच्या कॉलला स्वतः च्या पद्धतीने पोस्टर बनवू शकता. यासाठी तुम्ही तुम्हाला आवडता रंग, अक्षर किंवा चित्राचा वापर करु शकता.

6. स्क्रिनच्या एकदम जवळ आल्यावर आयफोन सूचना देईल

आयफोनमधील 'स्क्रीन डिस्टन्स' सेटिंग्समुळे तुम्हाला आयफोन तुमच्या चेहऱ्याच्या जवळ आल्यास किंवा तुमच्या डोळ्यावर ताण आल्यास अलर्ट देते. त्यामुळे तुम्ही तुमचा फोन डोळ्यापासून लांब ठेवून वापरु शकता.

Apple New Update
Jio Air Fiber : जिओ फायबरची बाजारात एन्ट्री! 600 रुपयात मिळणारं 550 चॅनेल, OTT Subscription आणि बरचं काही

7. आयफोनमधील सर्व माहिती सहज पाठवू शकता

जर तुम्हाला तुमच्या एका आयफोनमधील माहिती दुसऱ्या आयफोनमध्ये ट्रान्सफर करायची असेल तर त्यासाठी NameDropचा वापर करा. त्यामुळे तुम्ही दोन्ही डिव्हाइस एकमेकांशेजारी ठेवून फाईल्स सहज ट्रान्सफर करु शकता.

8. तुमचे मित्र कुठे आहात ते पाहू शकता

आयफोनचे Check-in फिचर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या स्थानाची माहिती देते. जर तो व्यक्ती योग्य स्थानी पोहचण्यास उशीर झाला तर त्या व्यक्तीची महत्त्वाची माहिती म्हणजे त्या डिव्हाइसचे स्थान, बॅटरी वैगेरे माहिती तुमच्यापर्यंत पोहचेल.

9. हेल्थ अॅप

आयफोनमधील हेल्थ अॅप तुम्हाला तुमच्या शारिरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.

Apple New Update
Making Cake in Cooker : बिना ओव्हनचा घरच्या घरी केक बनवताय? या सोप्या टिप्स फॉलो करा, बनेल एकदम सॉफ्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com