Internet Safety Tips: इंटरनेटचा वापर करताय? 'या' गोष्टीची काळजी घ्या, फसवणूकीपासून लांब रहा

इंटरनेटच्या वाढत्या लोकप्रियतेमध्ये, सायबर हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Internet safety tips
Internet safety tips Saam Tv
Published On

Internet Safety Tips : सध्याच्या युगात इंटरनेटचा वापर करणारे अनेक लोक आहे. मागच्या काही काळापासून इंटरनेटशिवाय लोकांचे जीवन असहाय्य झाले आहे. प्रवासात, कामाच्या ठिकाणी किंवा फ्री टाइममध्ये इंटरनेटचा सर्रास वापर केला जातो.

परंतु, याच वेळात अनेकदा त्याचा दूष्परिणामही पाहायला मिळतो. इंटरनेटच्या वाढत्या लोकप्रियतेमध्ये, सायबर हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही इंटरनेट वापरत असताना काही सामान्य चुका करत असाल तर तुम्हीही फसवणुकीला सहज बळी पडू शकता.

डिजिटलायझेशनच्या युगात इंटरनेट बँकिंगचा वापर प्रचंड वाढला आहे. अशा परिस्थितीत पासवर्ड लीक झाल्यामुळे लोक पैशांच्या फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे अनेकांचे सोशल मीडिया आयडी हॅक होतात. मात्र, इंटरनेट वापरताना काही काळजी घेऊन तुम्ही ही फसवणूक टाळू शकता. चला तर मग जाणून घेऊया इंटरनेटचा वापर करताना काळजी कशी घ्याल (Internet Safety Tips in Marathi)

Internet safety tips
Smartphone Offer : अवघ्या ७०० रुपयात मिळतोय 5G Smartphone, 14 नोव्हेंबरपर्यंत आहे खास ऑफर

इंटरनेट वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

1. फ्री वायफायचा वापर टाळा

अनेक वेळा फ्री वाय-फाय पाहून लोक ताबडतोब त्यांचा फोन कनेक्ट करतात आणि मोफत इंटरनेट सेवेचा आनंद घेऊ लागतात. पण यासोबत तुमच्या फोनचा डेटा इतर नेटवर्कवर शेअर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोफत वाय-फ्राय सेवा अतिशय काळजीपूर्वक वापरणे चांगले.

2. कोणतीही वेबसाइट उघडू नका

इंटरनेट वापरत असताना, बहुतेक लोक नाव न वाचता वेगवेगळ्या वेबसाइट उघडतात. तसेच, इंटरनेटवरील प्रत्येक वेबसाइट (Website) पूर्णपणे सुरक्षित नाही. त्यामुळे वेबसाइट उघडण्यापूर्वी https ची URL नक्की तपासा आणि फक्त या URL ने सुरू होणारी वेबसाइट उघडा. हे तुमच्या फोनची माहिती सुरक्षित ठेवते.

Internet safety tips
Mobile Phone Hacking : सावधान ! Android युजर्स 'या' चुका अजिबात करु नका; पडेल महागात, आयुष्यभराची कमाई जाईल पाण्यात

3. पासवर्ड शेअर करणे टाळा

काही लोकांना पासवर्ड विसरण्याची सवय असते. यामुळे बहुतेक लोक सर्व सोशल मीडिया अकाउंटसाठी एकच पासवर्ड टाकतात. अशा परिस्थितीत जर तुमचे एक खाते हॅक झाले तर सर्व खाती एकाच वेळी हॅक होऊ शकतात. त्यामुळे सोशल मीडियावरील सर्व खात्यांचे पासवर्ड स्वतंत्रपणे सेट करा आणि हे सर्व पासवर्ड डायरीत लिहून ठेवा.

4. बॅकअप सेट करा

इंटरनेट वापरत असताना, इलेक्ट्रॉनिक गॅझेटवर अनेकदा व्हायरसचा हल्ला होतो. यामुळे तुमच्या फोनमधील सर्व डेटा जाण्याचा धोकाही असतो. त्यामुळे इंटरनेट वापरण्यापूर्वी तुमचा स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅबलेट इत्यादींचा बॅकअप चालू करा. यामुळे तुमच्या फोनच्या (Phone) फाइल्स आणि माहिती सुरक्षित राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com