Smartphone Offer
Smartphone OfferSaam Tv

Smartphone Offer : अवघ्या ७०० रुपयात मिळतोय 5G Smartphone, 14 नोव्हेंबरपर्यंत आहे खास ऑफर

आजकाल अनेक साइट्सवर ऑफर मिळत असतात पण अशीच एक स्मार्टफोनची ऑफर आपल्याला अगदी कमी दरात मिळत आहे.

Smartphone Offer : मोबाईल फोन हल्ली प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. त्यातही तो स्मार्टफोन असेल तर सोने पे सुहागा म्हणता येईल. आजकाल अनेक साइट्सवर ऑफर मिळत असतात पण अशीच एक स्मार्टफोनची ऑफर (Offer) आपल्याला अगदी कमी दरात मिळत आहे.

आजकाल फ्लिपकार्टवर मोबाईल्स फोनचा (Phone) सेल सुरू आहे. 14 नोव्हेंबरपर्यंत असणाऱ्या सेलमध्ये तुम्ही सर्वोत्तम ऑफर्स आणि डील्समध्ये टॉप कंपन्यांकडून स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्याच वेळी, जर तुम्ही 15 हजार रुपयांच्या आत तुमच्यासाठी एक उत्तम स्मार्टफोन शोधत असाल, तर Realme 9i 5G तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी १७,९९९ रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही 4,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 13,999 रुपयांना खरेदी करू शकता.

Smartphone Offer
Smart Tips: टूथपेस्टने हटवा मोबाईल स्क्रीनवरचे स्क्रॅचेस; पण 'ही' काळजीही घ्या...

कशी मिळेल ऑफर

फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही Flipkart वर Axis Bank कार्ड वापरल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 13,300 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. जुन्या फोनच्या बदल्यात पूर्ण एक्सचेंज मिळाल्यावर, हा फोन तुमचा 13,999-13,300 म्हणजेच 699 रुपयांचा असू शकतो. लक्षात ठेवा की, जुन्या फोनसाठी एक्सचेंज ऑफरही त्याच्या स्थितीवर अवलंबून असेल.

Realme 9i 5G ची वैशिष्ट्ये

  • या फोनमध्ये आपल्याला 2408×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले देत आहे.

  • हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये आढळणारा हा डिस्प्ले 400 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो.

  • रियलमीचा हा फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीपर्यंत अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध आहे.

  • प्रोसेसर म्हणून कंपनी त्यात MediaTek Dimension 810 5G चिपसेट देत आहे.

  • फोटोग्राफीसाठी याच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.

  • यामध्ये एक पोर्ट्रेट आणि 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे.

  • त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Smartphone Offer
Smartphone Overuse : स्मार्टफोनच्या अतिवापरामूळे मुलांसह पालकांवर होतोय परिणाम
  • कंपनी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देत ​​आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

  • OS बद्दल बोलायचे झाले तर, फोन Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर काम करतो.

  • कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com