Cancer: धूम्रपान न करताही भारतीयांना होतोय कॅन्सर; लॅन्सेटच्या अहवालातून धोक्याचा इशारा

Cancer Lancet Report: आता कॅन्सर संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे. भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय. धक्कादायक बाब म्हणजे यात लंग्स कॅन्सर रुग्णांचं प्रमाण अधिक आहे. भारतीयांना लंग्स कॅन्सर का होतोय, याचं कारण ऐकाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Cancer: धूम्रपान न करताही भारतीयांना होतोय कॅन्सर; लॅन्सेटच्या अहवालातून धोक्याचा इशारा
Cancer Lancet ReportSaam tv
Published On

गेल्या काही वर्षात भारतात कॅन्सर रूग्णांची संख्या सातत्यानं वाढलीय. त्यातही फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण अधिक आहे. विडी- सिगारेट ओढणं, तंबाखू, गुटखा, मावा हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमुख कारण आहे. मात्र अलीकडेच लॅन्सेटनं प्रकाशित केलेल्या अहवालात एक धक्कादायक माहिती समोर आलीय. या अहवालानुसार भारतीयांच्या लंग्स कॅन्सरचं कारण केवळ धूम्रपान नाही तर हवा प्रदूषणामुळेही कॅन्सर रुग्ण वाढू लागले आहेत.

लॅन्सेटमार्फत दक्षिण पूर्व आशियातील देशांचा अभ्यास करण्यात आला. त्यात 40 शहर सर्वाधिक प्रदूषित जाहीर करण्यात आली. महत्वाचं म्हणजे यामध्ये भारतातील 4 शहरांचा समावेश आहे. अभ्यासानुसार भारतातील बहुतांश फुफ्फुसाचे कॅन्सरचे रुग्ण धूम्रपान करत नसल्याचं समोर आलंय. हे रुग्ण हवा प्रदूषणाचे बळी ठरलें आहेत.

एका अभ्यासानुसार भारतात 2020 मध्ये 72 हजार 520 कॅन्सरची प्रकरणं आढळून आली. तर 66 हजार 280 रूग्णांचा कॅन्सरमुळे मृत्यू झालाय. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र त्यातही फुफ्फुस्सांच्या कॅन्सर रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीय. वाढतं प्रदूषणाची समस्या भारतासाठी कायम डोकेदुखीचा विषय बनलाय. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता या शहरातील हवेचं प्रदूषण रोखण्यात अद्याप यश आलेलं नाही. मात्र हेच प्रदूषण कॅन्सरच्या रुपात माणसांच्या जिवावर उठत असेल तर देशासाठी ही नक्कीच धोक्याची घंटा म्हणावी लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com