India Post Recruitment 2023 : 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! टपाल खात्यात ३० हजार जागा रिक्त, कसा कराल अर्ज?

Post Office Job Opportunities : १० वी पास झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.
India Post Recruitment 2023
India Post Recruitment 2023 Saam tv
Published On

Post Office Job Vacancy : सरकारी क्षेत्रात नोकरीची इच्छा पाहणाऱ्या तरुणांचे लवकरच पूर्ण होणार आहे. टपाल खात्यात भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. १० वी पास झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

भारतीय डाक विभागात मेगा भरती सुरु झाली असून Indian Post मध्ये ३००४१ मध्ये रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी महिला व पुरुष दोघेही अर्ज करु शकतात. कसा कराल अर्ज जाणून घेऊया.

India Post Recruitment 2023
WhatsApp HD Photo Update: Photo-Video सेंड करताना होणार नाही Blur, HD Quality मध्ये पाठवता येणार, कसे जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

1. पदाचे नाव

  • भारतीय डाक (Post Office) विभाग भरतीसाठी 02 पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.

  • GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)

  • GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

  • एकूण जागा - 30041

2. शिक्षण पात्रता

अर्जदार 10वी पास असणे आवश्यक आहे. आणि मूलभूत संगणक ज्ञान किवा प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे.

3. वयाची अट

  • अर्जदाराचा जन्म 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे.

  • SC/ST: 05 वर्षे सूट

  • OBC: 03 वर्षे सूट

India Post Recruitment 2023
How To Set Data Limit Speed : फुल ऑन मजा! दिवसभर कितीही युज करा डेटा,संपणारच नाही; फक्त ही एक सेटिंग ऑन करा

4. नोकरीचे ठिकाण

भारत (All India)

5. अर्ज फी

भारतीय डाक विभाग भरतीसाठी SC/ST/PWD व महिला यांना फी नाही आहे. General/OBC/EWS: 100/-

6. तारीख

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

  • अर्ज संपादित करण्याची तारीख - 24 ते 26 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज एडिट करू शकता.

India Post Recruitment 2023
Good Habits In Children : मुलांना लहानपणापासूनच या ९ चांगल्या सवयी लावा, लोक म्हणतील वाह!

7. पगार

  • भारतीय डाक विभाग भरतीसाठी पात्र झाल्यानंतर तुम्हाला पदानुसार पगार (Salary) दिली जाणार आहे.

  • GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) - 12,000 ते 29,380

  • GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) - 10,000 ते 24,470

  • अधिक माहितीसाठी अधिकृत साइटला भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com