ट्रेकिंगला जाताय तर असे शूज निवडा

ट्रेकिंगला जाण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टींची निवड करतो.
Trekking shoes tips
Trekking shoes tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई :आपल्यापैकी बऱ्याच जणांना ट्रेकिंगला जाण्याची आवड असते. ट्रेकिंगला जाण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टींची निवड करतो. कोणत्या ठिकाणी जायच यापासून ते कोणत्या वेळी जायचं असं प्लानिंग आपलं सुरु असतं

हे देखील पहा-

ट्रेकमध्ये रेकिंग शूज खूप मोठी भूमिका बजावतात. वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेकसाठी वेगवेगळे शूज योग्य असतात. म्हणजे स्नो ट्रेकिंग शूज फक्त बर्फावरच वापरता येतील का? शूज खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या? शूजची निवड कशी कराल? ट्रेकिंग शूज कसे खरेदी करावे त्यांची देखभाल कशी करावी याविषयी जाणून घ्या.

ट्रेकिंग शूज कसे निवडायचे

१. चांगली पकड असलेले ट्रेकिंग शू ओळखण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याची खोबणी पाहणे, ते खोल आहेत का ते तपासणे. बुटाच्या खालच्या भागात चिखल, घाण अडकते तरी देखील बुटाची चिखलावर घट्ट पकड आहे का? हे तपासणे. आपण शूज खरेदी करायला गेल्यानंतर त्याची खोली आणि चांगली पकड असल्याची खात्री करा.

Trekking shoes tips
निसर्गप्रेमींनो, यंदाच्या पावसाळ्यात या पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

२. आपण विविध ठिकाणी ट्रेकिंगला (Trekking) जातो अशावेळी शूजना त्या ठिकाणाशी जुळवून घ्यावे लागते. त्यासाठी आपण मऊ आणि लवचिक शूज निवडण्याचा प्रयत्न करावा. ते तपासण्यासाठी आपण धातूची वस्तू घेऊन सोलवर टॅप करा. मऊ तळवा मंद आवाज काढेल व जर तीक्ष्ण आवाज ऐकू आल्यास हे समजेल की शूज खूप कठीण आहे. असा सोल ट्रेकला चालत नाही.

३. आपल्यापैकी बरेच जण धावण्याचे शूज आणि स्पोर्ट्स शूज भरपूर लवचिकता आणि चांगली पकड असलेले घेऊन येतात. पण त्यांच्यामध्ये आपल्या पायाच्या घोट्याच्या आधाराची कमतरता असते. ट्रेकिंगला आपल्याला सतत वर -खाली चढावे लागते अशावेळी आपला घोटा फिरुन पायाला दुखापत होण्याची शक्यता असते.ट्रेकिंग शूज निवडताना घोट्याला चांगला आधार मिळेल याची खात्री करा.

४. आपल्या योग्य फिटसाठी शूज नेहमी तपासा. शूज खरेदी करताना आपल्या पायाच्या आकारापेक्षा थोड्या मोठ्या साइजचे ट्रेकिंग शूज खरेदी करावे. मोठ्या साइजचे शूज घेतल्यानंतर ते आपल्याला चावणार नाही.

५. शूज खरेदी करताना ते वॉटरपूफ्र आहेत का ते तपासा. आपण अधिकतर पावसाळा (Monsoon) आणि हिवाळ्यात ट्रेकिंगला जातो तिथे पाणी किंवा घसरट जागेमुळे आपला तोल जाऊ शकतो. आपण अशावेळी लेदरचे शूज निवडावे.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com