मुंबई : जून महिना सुरु झाला की, उष्णतेची लाट कमी होऊन हलक्या पावसाच्या (Rain) सरी बरसू लागतात. सगळीकडे हिरवळ, वातावरणात पसरलेला गारवा, कोसळणाऱ्या सरी आणि बेधूंद करणारा मातीचा सुवास आपल्याला सर्वत्र जाणवू लागतो.
हे देखील पहा -
या पावसाळ्यात हिरवाई आणि सुंदर धबधब्यांमध्ये घालवायचा असेल तर या ठिकाणी भेट देऊन पहा.
शिवडी खारफुटी पार्क
आपल्याला पक्षी (Birds) पाहण्याची अधिक आवड असेल तर आपण पावसाळ्यात पहाटेच्या वेळी शिवडीच्या मॅंग्रोव्ह पार्क उर्फ शिवडी फ्लेमिंगो पॉइंटला भेट देऊ शकतो. या उद्यानाला बॉम्बे पोर्ट ट्रस्टने संरक्षित क्षेत्र घोषित केले आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांत फ्लेमिंगो पाहण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण असून पावसाळ्यात येथे पक्षी व नयनरम्य असा निसर्ग दिसतो. येथे आपल्याला गॉडविट्स, रेडशँक्स, ग्रीनशँक्स, एग्रेट्स, पॉन्ड हेरॉन्स आणि रीफ हेरॉन्स सारखे इतर पक्षी आपण पाहू शकता. या उद्यानात १५ एकर खारफुटी आहे जी मासे आणि पक्ष्यांसाठी सुपीक जमीन प्रदान करते. शिवडी स्टेशनजवळ मॅंग्रोव्ह पार्क आहे.
कसारा घाट
थळ घाटला कसारा घाट म्हणून ओळखले जाते. इगतपुरीजवळील कसारा घाट हा पश्चिम घाटाच्या सह्याद्रीच्या रांगेच्या मध्यभागी वसलेला आहे. हा अतिशय सुंदर हिल स्टेशन असून अनेक पर्यटकप्रेमींच्या जवळचा आहे. सुंदर धबधबे आणि धुक्याने आच्छादित टेकड्या येथे पाहण्यासारखे आहे. आजूबाजूची प्रमुख आकर्षणे म्हणजे हिरवीगार कॅमल व्हॅली, मंत्रमुग्ध करणारे अशोक आणि विहिगाव धबधबे, शांततापूर्ण बौद्ध केंद्र धम्म गिरी, जुना त्रिंगलवाडी किल्ला आणि करोली घाट येथे पाहायला मिळते
कर्नाळा किल्ला
रायगडाच्या डोंगररांगेतून निसर्ग (Nature), साहस आणि इतिहास अनुभवू शकणारा पनवेलजवळील कर्नाळा किल्ला. हा किल्ला फनेल हिल म्हणूनही ओळखले जाते. हा किल्ला कर्नाळा पक्षी अभयारण्याचा भाग आहे. पांडू टॉवर म्हणून ओळखला जाणारा १२५ फूट उंच बेसाल्ट स्तंभ हे येथील प्रमुख आकर्षण आहे. कर्नाळा किल्ला प्रबलगड आणि राजमाची किल्ल्यांचे अविश्वसनीय दृश्य देते. तसेच किल्ल्यावर मराठी आणि पर्शियन शिलालेख आहेत जे वास्तूच्या प्राचीन भूतकाळाची साक्ष देतात.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.