Nagpuri Tarri Poha Recipe: रेग्युलर कांदे पोहे खाऊन आलाय कंटाळा, तर बनवा नागपूरी तर्री पोहे; पाहा रेसिपी

Nagpuri Style Tarri Poha : सकाळचा नाश्ता असो किंवा पाहुण्यांसाठी काही बनवायचे असो, पहिले डोळ्यांसमोर येतं ते कांदे पोहे.
Nagpuri Tarhi Poha
Nagpuri Tarhi PohaSaam Tv
Published On

Recipe Of Nagpuri Tarri Poha : सकाळचा नाश्ता असो किंवा पाहुण्यांसाठी काही बनवायचे असो, पहिले डोळ्यांसमोर येतं ते कांदे पोहे. काही घरांमध्ये तर रात्रीच्या जेवणाच्या वेळी सुद्धा पोहे खाल्ले जातात. फक्त कांदे पोहेच नाही तर त्यापासून बनवणारे विविध पदार्थ देखील लोक आवडीने खातात. पोहे हे एक प्रकारे भारतातील सर्वात आवडता नाश्ता आहे.

तर्री-पोहे हा नागपूरमधील (Nagpur) फेमस (Famous) पदार्थ. पोह्यांवर गावराणी चण्याच्या उसळीचा लाल तर्रीदार रस्सा घेऊन खाल्ला जातो. नागपूरमध्ये गल्लोगल्ली ठेल्यावर हे पोहे विकायला असतात.

Nagpuri Tarhi Poha
Katori Chaat Recipe : पावसात काही चटपटीत खावसं वाटत का? घरीच बनवा 'हे' स्ट्रीट स्टाईल कटोरी चाट

साहित्य

  • 100 ग्रॅम तयार पोहे

  • 100 ग्रॅम काळे चणे

  • 1 कांदा

  • 1 टमॉटो

  • 2 टेस्पुन तेल

  • 1 टीस्पून हिरवी मिरची लसूण पेस्ट

  • 1 टीस्पून सावजी मसाला

  • 1 टीस्पून तिखट

  • 1/2 टीस्पून हळद

  • चवीनुसार मीठ

तऱ्हीसाठी साहित्य

- हरभरा 2 कप (भिजवलेले)

- मीठ चवीनुसार

- तेल

- खोबरं 1/3 कप

- कांदा (Onion) 2-3 मध्यम आकाराचे (चिरलेले)

- टोमॅटो 2-3

- लसूण 5-6 पाकळ्या

- आले 1 इंच तुकडा

- दालचिनी 1 इंच

- हिरवी वेलची 3-4

- काळी वेलची 1-2

- लवंग 4-5

- काळे मिरे - 4-6

- तमालपत्र 2-3

- आमचूर पावडर 1 टीस्पून

- मोहरी 1 टीस्पून

- जिरे 1 टीस्पून

- हिंग 1 टीस्पून

- हळद 1/2 टीस्पून

- लाल तिखट 4 टेबलस्पून

- कोथिंबीर 1 टेबलस्पून

- जिरा पावडर 1 टीस्पून

- काळा मसाला - 2 टीस्पून

- मीठ चवीनुसार

- पाणी

Nagpuri Tarhi Poha
Flaxseeds Paratha Recipe : नाश्त्यात बनवा हेल्दी व पौष्टिक असा अळशीचा पराठा, उच्च रक्तदाब राहिल नियंत्रणात!

कृती -

नागपूरी तऱ्ही पोहे बनवण्याची पद्धत

तऱ्ही पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम तऱ्ही बनवण्यासाठी आदल्या रात्री हरभरा भिजत घाला किंवा साधारण 8 ते 10 तास ते भिजवावे. दुसऱ्या दिवशी ते चांगले धुवून घ्या आणि कुकरमध्ये ठेवा. आता त्यात चवीपुरते थोडे मीठ आणि पाणी टाकून शिजवा. कुकरच्या 2 ते 3 शिट्या घ्या. कुकर थंड झाल्यानंतर त्यातील हरभरे काढून घ्या. त्याचे पाणी फेकू नका ते एका बाजूला ठेवा. आता तऱ्ही बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात खोबरे टाकून ते ब्राउन होईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात कांदा, आले, लसूण टाका. हे नीट शिजल्यानंतर सर्व खडा मसाला टाका. 2 मिनिटे मध्यम आचेवर नीट भाजून घ्या. आता गॅस बंद करून हे थंड होऊ द्या. नंतर मिक्सरच्या जार मध्ये टाका आणि त्यात 50 मिली पाणी टाकून चांगले ब्लेंड करा. याची पेस्ट झाल्यानंतर ती ग्रेव्ही बनवण्यासाठी बाजूला ठेवा.

Nagpuri Tarhi Poha
Mango Coconut Laddoo Recipe : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी चविष्ट आंबा आणि खोबऱ्याचे लाडू बनवा, पहा रेसिपी

आता त्याच पॅनमध्ये अजून अर्धा कप तेल घ्या. या रेसिपीमध्ये तऱ्हीसाठी जास्त तेल घेणे आवश्यक आहे. तेल गरम करा आणि त्यात जिरे, मोहरी, तमालपत्र आणि हिंग घाला. आता त्यात तयार केलेली कांदा खोबऱ्याची पेस्ट घाला. पेस्टचा सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. आता गॅस कमी करा आणि त्यात तिखट, हळद, मीठ टाका आणि मिक्स करा. मसाल्यातून तेल वेगळे होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता त्यात शिजलेले चणे, ताजी चिरलेली कोथिंबीर टाका आणि 2-3 मिनिटे शिजवा. आता त्यात हरभऱ्याचे पाणी आणि थोडे अजून पाणी घाला. उकळी येईपर्यंत शिजवा. तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. नंतर आमचूर पावडर घाला, मिक्स करा आणि उकळी आणा. मध्यम आचेवर किमान 20-25 मिनिटे शिजवा. कोथिंबीर आणि टोमॅटोने गार्निश करा. तुमची तऱ्ही तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com