How to Stop Yawning : ऑफिसच्या मीटिंगमध्ये पापण्या जड होतात आणि जांभई येते? 'या' टीप्सने मिनिटात झोप उडेल

How to Stop Yawning : ऑफिसमध्ये बॉससमोर काम करताना किंवा महत्वाचा टॉपीक सुरू असताना तुम्ही जांभई दिली तर तुमचं बॅज इंप्रेशन पडतं. असं होऊ नये म्हणून जांभई कशी रोखावी या बद्दलच आज आम्ही माहिती सांगणार आहोत.
How to Stop Yawning
How to Stop Yawning Saam TV
Published On

ऑफिसमध्ये अनेकदा मिटिंग सुरू असाताना काही व्यक्तींना जांभई येते. जांभई येणे फार सामान्य गोष्ट आहे. मात्र जांभई येण्याचे प्रमाण योग्य असणे महत्वाचं आहे. काही व्यक्तींना दिवसातून ८ ते १२ वेळा जांभई येते. तर काही व्यक्तींना दिवसातून १२ पेक्षा जास्त वेळा जांभई येते. जांभई येणे हा काही आजार नाही. आपली झोप पूर्ण न झाल्याने शरीराला झोपेची आणि विश्रांतीची गरज असल्याचा संदेश देण्यासाठी ही जांभई येत असते असं म्हणतात.

How to Stop Yawning
Yoga Tips Heart Problem : हृदयाच्या समस्यांवर मात करण्यासाठी दररोज ही योगासने करा

ऑफिसमध्ये काहीवेळा प्रझेंटेशन किंवा मिटिंग सुरू असली की सर्व व्यक्ती शांत असतात. शांततेमुळे सुद्धा ज्यांची झोप पूर्ण झालेली नाही त्यांना लगेचच झोप लागते. मात्र ऑफिसमध्ये सर्वांसमोर असं करणे फार चूक आहे. ऑफिसमध्ये बॉससमोर काम करताना किंवा महत्वाचा टॉपीक सुरू असताना तुम्ही जांभई दिली तर तुमचं बॅज इंप्रेशन पडतं. असं होऊ नये म्हणून जांभई कशी रोखावी या बद्दलच आज आम्ही माहिती सांगणार आहोत.

चहा प्या

चहा किंवा कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफेन असतं. कॅफेन शरीरात गेल्याने आपल्याला भूक कमी लागते. तसेच झोप सुद्धा फार कमी येते. त्यामुळे अनेक मिटिंगमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आधीच चहा किंवा कॉफी पिण्यासाठी दिली जाते.

कोल्ड ड्रिंक

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास डियाड्रेशन होतं. त्यामुळे सुद्धा आपल्याला थकवा येतो आणि जास्त जांभई येतात. तुम्हाला सुद्धा असे होत असेल तर सर्वात आधी तुमच्या आवडीचं कोल्ड ड्रिंक घ्या. असे केल्याने तुम्हाला येणाऱ्या जांभया कमी होतील.

फळांचा ज्यूस

फळं आपल्या शरीरातील तापमान मेनटेन करतात. त्यामुळे जांभई येत असल्यावर फळे खा किंवा फळांचा ज्यूस पिण्यास सुरुवात करा. त्याने जांभई येण्याचे प्रमाण कमी होते.

कोल्ड कॉम्प्रेस

जर तुमच्याकडे कोल्ड ड्रिंक किंवा फळे असे काहीच खाण्यापिण्याचे पदार्थ नसतील तर यावर आणखी एक उपाय शोधला आहे. त्यासाठी आधी एक बर्फाचा तुकडा घ्या. हा बर्फ तुमच्या गालावर किंवा मग डोक्यावर ठेवा. थंड बर्फामुळे सुद्धा झोप झटकन उडते.

नाकाने दीर्घ श्वास घ्या

जेव्हा शरीरात जास्त ऑक्सिजनचा पुरवठा निट होत नाही तेव्हा सुद्धा आपल्याला जांभई येण्यास सुरुवात होते. त्यामुळे जांभई येऊ नये म्हणून दीर्घ श्वास घेण्यास सुरुवात करा. यामुळे तुमच्या मेंदूला सुद्धा व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होईल आणि जांभई येण्याचं प्रमाण कमी होईल.

How to Stop Yawning
yawning Facts: दुसऱ्याला बघून तुम्हालाही जांभई येते, असं का होतं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com