रोजच्या व्यस्त आणि धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला मेडिटेशन करावं वाटतं. डोकं शांत रहावं, मनातील सर्व विचार निघून जावे, मन आनंदी रहावं यासाठी आज प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे. काही जण दररोज मेडिटेशन देखील करतात. मात्र जेव्हा आपण ध्यानासाठी बसतो तेव्हा अनेकदा मनात विविध विचार येतात. या विचारांनी मन आणखी अस्वस्थ होतं आणि मेंदूवर ताण पडतो. या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही काही सुंदर टिप्स आणल्या आहेत. त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.
रिलॅक्स व्हा
सर्वात आधी तुम्ही रिलॅक्स व्हा. मेडिटेशनसाठी रिलॅक्स होणे गरजेचे आहे. त्यामुळे डोकं हलकं राहतं. तसेच आपल्या मनात कोणतेही विचार येत नाहीत. शांत मनाने मेडिटेशन करता येतं. त्यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहतं.
योग्य वातावरण निवडा
मेडिटेशन करायचे असेल तर तुम्ही ते कोणत्या ठिकाणी करत आहात ते चेक करा. मेडिटेशनचे ठिकाण शांत असायला हवे. शांत ठिकाण असल्यास तुम्ही शांततेने येथे ध्यान करू शकता. अनेक व्यक्ती गोंगाट किंवा कसलेही आवाज येत असताना मेडिटेशन करतात, मात्र त्याने मनावरचा ताण जास्त वाढतो.
संगीत ऐका
शांत बासरीची म्युजीक ऐकणे प्रत्येकाला आवडतं. संगीत ऐकणे हे देखील मेडिटेशनचा एक भाग आहे. त्यामुळे मेडिटेशन करताना गाणं किंवा सुंदर संगीत ऐकण्याची सवय लावा. त्यामुळे डोके दुखी सारख्या समस्या देखील ठीक होतात.
वेळ ठरवा
प्रत्येक गोष्टीचा एक कालावधी असतो. ती गोष्ट रोजच्या रुटिनमध्ये ठरावीक वेळेत पार पडणे महत्वाचं आहे. त्यामुळे मेडिटेशन करताना कायम एक वेळ निश्चित करा. त्यानुसार दररोज त्याच वेळी मेडिटेशन करा.
घाई करू नका
सध्या व्यक्ती इतक्या व्यस्त झाल्यात की प्रत्येक कामासाठी त्यांना घड्याळाच्या काट्यावर पळावे लागते. तुमचं आयुष्य सुद्धा असंत जास्त व्यस्त आणि धकाधकीचं असेल तर मेडिशनसाठी जास्तीचा वेळ काढून ठेवा. त्यानंतरच मेडिटेशन करा. मेडिटेशन घाईमध्ये लवकर संपवू नका.
टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.