School Morning : मुलांच्या शाळेची सकाळी होणारी घाईगडबड कमी करायचीये? जाणून घ्या सोपे उपाय

Parenting Tips : शाळेच्या सकाळच्या गडबडीत पालकांना होणारा ताण कमी करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा. नियोजन, वेळेवर झोप आणि तयारीने सकाळ सहज आणि आनंदी होऊ शकते.
Parenting tips for easy school mornings
Parenting tips for easy school morningsgoogle
Published On
Summary

रात्रीच शाळेची तयारी करून ठेवल्यास सकाळची गडबड कमी होते.

मुलांना पुरेशी झोप मिळाली तर त्यांना वेळेवर उठवणं सोपं होतं.

पालकांनी स्वतः लवकर उठण्याची सवय लावल्यास सकाळचा वेळ व्यवस्थित हाताळता येतो.

थोडं नियोजन आणि सवयींमध्ये बदल केल्यास शाळेच्या सकाळी तणावरहित आणि आनंदी बनतात.

लहान मुलांना पुरेशी झोप खूप आवश्यक असते. त्यात जेव्हा आपलं मुलं शाळेत जाण्याच्या वयाचं होतं तेव्हा पालकांना त्यांच्या झोपेच्या वेळा बदलाव्या लागतात. त्यामुळे पालकांना दररोज सकाळी मुलांना झोपेतून उठवून शाळेत पाठवणं कठिण झालं आहे. ही समस्या काहींना साधी वाटत असली तरी ती मुळात नसतेच.

बरेच पालक सकाळच्या घाईगडबडीत मुलांना उठवणं, त्यांचा गणवेश घालणं, नाश्ता देणं आणि त्यांच्यासाठी खास टिफीन पॅक करणं या सर्व गोष्टींमध्ये पालक गोंधळून जातात. यामुळे केवळ आईचाच नव्हे तर संपूर्ण घराचाच ताण वाढतो. मात्र, जर थोडंसं नियोजन करून हा दिनक्रम आखला, तर ही सकाळ खूपच सोपी होऊ शकते.

Parenting tips for easy school mornings
Skin Cancer : उन्हामुळे होतो स्कीन कॅन्सर! ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल क्लार्कची शस्त्रक्रिया

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी उद्याची तयारी करून ठेवणे. मुलांचा गणवेश, शूज, बॅग आणि पाण्याची बाटली तयार करून ठेवली तर सकाळी बराच वेळ वाचतो. तसेच, दुसऱ्या दिवशी टिफिनमध्ये काय द्यायचं? याचं नियोजन रात्रीच केलं पाहिजे. भाज्या चिरून ठेवणे किंवा भाजीचा मसाला आधीच तयार ठेवणे यामुळे सकाळच्या घाईत होणारा गोंधळ कमी होतो.

यासोबत वेळेवर उठणं देखील तितकंच गरजेचं आहे. मुलांना लवकर उठवण्यासाठी पालकांनी स्वतः आधी लवकर उठायला सुरुवात करावी. ही सवय पालकांचं ५० टक्के वेळ वाचवते. झोपण्यापूर्वी अलार्म लावला, तर सकाळी कामं वेळेवर पूर्ण करता येतात. मुलांमध्ये हळूहळू वेळेवर उठण्याची आणि वेळेत झोपण्याची सवय लावली तर त्यांचंही शाळेसाठी वेळेत तयार होणं सहज शक्य होतं.

Parenting tips for easy school mornings
Kumbha Rashi : कुंभ राशीच्या शनिवार कसा जाणार? पैशांसाठी दिलेला हा सल्ला नक्की वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com