Cholesterol: कोलेस्ट्रॉलच्या धोक्यापासून बचाव कसा करावा? त्यासाठी महत्त्वाचे उपाय

Cholesterol Awareness: यकृत आपल्या शरीरासाठी आवश्यक कोलेस्ट्रॉल तयार करतो, पण वाढलेली पातळी घातक ठरू शकते. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार, त्याचे परिणाम आणि प्रतिबंध कसे करावेत हे जाणून घ्या.
Cholesterol
Cholesterolyandex
Published On

कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक असले तरी, त्याची असंतुलित पातळी ह्रदयरोगांना कारणीभूत ठरु शकते. बॅड कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LDL-C च्या वाढत्या पातळीमुळे ह्रदयरोगांचा धोका वाढतो. जागतिक स्तरावर, उच्च कोलेस्ट्रॉलमुळे दरवर्षी ४.४ दशलक्ष मृत्यू होतात, जे एकूण मृत्यूंच्या ७.८% आहे. भारतात ३१ टक्के लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल आढळून आले आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर लक्ष ठेवणे आणि योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होऊन प्लेक तयार करते, ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिसची स्थिती निर्माण होते. प्लेक रक्तवाहिन्या अरुंद करतं, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि धमनी रोग होण्याची शक्यता वाढते. उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी सहसा लक्षणशून्य असते, म्हणूनच त्याला 'सायलेंट किलर' असे संबोधले जाते. अनेकदा लोकांना हे तेव्हा कळते जेव्हा गंभीर आरोग्य समस्या उभी राहतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

Cholesterol
Health Alert: सावधान! तुम्हालाही शौचालयात मोबाईल वापरण्याची सवय आहे का? 'या' सवयीमुळे होऊ शकतात हे आजार

उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या कोणत्याही वयात होऊ शकते, जी पूर्वी फक्त ५० वर्षांनंतर होण्याचा समज होता. आता ही धारणा बदलली आहे. १८ व्या वर्षापासून नियमित लिपिड प्रोफाइल चाचणी करणे महत्त्वाचे आहे. लवकर ओळख आणि वेळेवर उपचार घेतल्यास गंभीर आरोग्य समस्यांना प्रतिबंध करता येऊ शकतो. यामुळे हृदयरोग आणि अन्य जटिल समस्या टाळता येतात.

Cholesterol
Periods: तुमच्या मासिक पाळीवर वजनाचा परिणाम का होतो? जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

निरोगी जीवनशैली स्वीकारा

- निरोगी आहार - संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट्स टाळा. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करा.

- नियमित व्यायाम - दररोज ३० मिनिटे शारीरिक व्यायाम, जसे चालणे, धावणे किंवा योगा, कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करू शकतात.

- वजन व्यवस्थापन - जास्त वजनामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. निरोगी वजन राखण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करा.

Cholesterol
Health Alert: तुम्हीही सतत रिल्स पाहत असतात का? ही सवय तुम्हाला किती धोकादायक आहे ते जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com