Independence Day 2023 Recipe : कलरफुल तिरंगी बर्फी; तोंडात टाकताच विरघळेल, पाहा रेसिपी

How To Make Tricolor Barfi : काही गोडाचा पदार्थ बनवण्यास सांगितले तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करुन पाहू शकता.
Independence Day 2023 Recipe
Independence Day 2023 RecipeSaam tv
Published On

Tricolor Barfi Recipe : दरवर्षी स्वातंत्र्य दिन हा उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात अनेक दिवसांपूर्वीच होते. प्रत्येक ठिकाणी यादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांच्या शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची तयारी महिन्यांपासून सुरू होते.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, शाळा शक्य तितक्या तिरंगी थीममध्ये गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करते. मुलांमध्ये तिरंगी थीम संदर्भात स्पर्धा देखील घेतली जाते, ज्यामध्ये तिरंगी थीम अधिक फॉलो करणाऱ्या मुलास बक्षीस दिले जाते. अशा परिस्थितीत मुलांना तिरंगी थीममध्ये जर काही गोडाचा पदार्थ बनवण्यास सांगितले तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करुन पाहू शकता. जाणून घेऊया तिरंगी बर्फी बनवण्याची पद्धत

Independence Day 2023 Recipe
Shravan Recipe 2023 : श्रावणात नैवेद्यासाठी स्वीट डिश बनवायचा आहे? ट्राय करा पौष्टिक तिळाची खीर, पाहा रेसिपी

1. साहित्य

  • ताजा मावा - 400 ग्रॅम

  • साखर (Sugar) - 350 ग्रॅम

  • ताजे पनीर - 150 ग्रॅम

  • खायचा रंग भगवा आणि हिरवा

  • वेलची पावडर - अर्धा टीस्पून

  • चांदीचा वर्क

2. कृती

  • तिरंगी बर्फी बनवण्यासाठी प्रथम खवा आणि पनीर किसून घ्या.

  • आता कढईत ठेवून ती गरम करुन घ्या नंतर त्यात साखर घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅस मध्यम आचेवर ठेवा.

  • पनीरमध्ये साखर वितळेपर्यंत आणि घट्ट होईपर्यंत ढवळत राहा नाहीतर मिश्रण चिकटेल.

  • मिश्रण एकजीव होऊन कढईतून वेगळे होऊन कोरडे झाल्यावर त्यात वेलची पूड मिसळा आणि गॅस बंद करा.

Independence Day 2023 Recipe
Don't Eat Wheat For A Month : महिनाभर गव्हाचे पदार्थ खाऊच नका, शरीरात होतील हे बदल
  • तयार मिश्रणाचे तीन भाग करा आणि एक पांढर्‍या रंगाचे मिश्रण वेगळे करा.

  • उरलेल्या दोन भागात केशर आणि हिरवा रंग मिसळा.

  • तूप (Ghee) लावलेल्या ट्रेमध्ये हिरवे मिश्रण पसरवा आणि रोलिंग पिनच्या मदतीने समान रीतीने पसरवा.

  • आता त्यावर पांढऱ्या रंगाचे मिश्रण पसरवा आणि समान रीतीने रोल करा आणि हिरव्या रंगाने पेस्ट करा.

  • आता केशरी रंगाचे मिश्रण पांढऱ्यावर समान रीतीने पेस्ट करा आणि गुंडाळा. चांदीच्या वर्कने सजवा.

  • तुमची बर्फी (Barfi) तयार आहे, बर्फीच्या आकारात कापून सर्व्ह करा किंवा मुलांच्या जेवणाच्या डब्यात पॅक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com