Mix Veg Bhaji: मुलं सगळ्या भाज्या करतील फस्त, थंडीत चहाबरोबर करा कुरकरीत भजीचा बेत

Winter Snacks: थंडीत चहाबरोबर खाण्यासाठी मिक्स व्हेज सूजी पकोडा हा झटपट, हेल्दी आणि टेस्टी पर्याय आहे. रंगीत भाज्या आणि रव्याचा तडका मिळून बनतो कुरकुरीत स्नॅक.
crispy pakoda recipe
mix veg bhaji recipegoogle
Published On

थंडीच्या दिवसांत प्रत्येकाचं मन काहीतरी गरमागरम आणि खमंग खाण्याचं होतं. अशा वेळी जर तुम्हाला काही हेल्दी, टेस्टी आणि झटपट बनवायचं असेल, तर मिक्स व्हेज सूजी पकोडा हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. या पकोड्यांमध्ये रव्याची मऊसर चव आणि रंगीबेरंगी भाज्यांचा सुंदर तडका मिळून एक अप्रतिम कॉम्बिनेशन तयार होतं. हे पकोडे बाहेरून खमंग कुरकुरीत आणि आतून मऊ असतात. संध्याकाळच्या चहासोबत, पावसाळ्यात किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी हा झटपट स्नॅक अगदी योग्य ठरतो. लहान मुलं भाज्या खात नसतील तर तुम्ही हे भजी त्यांना देऊ शकता.

मिक्स व्हेज भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ कप रवा, दीड कप दही, १ बारीक चिरलेला कांदा, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ किसलेली गाजर, दीड कप चिरलेली शिमला मिरची, दीड कप चिरलेली पत्ता गोभी, १ टीस्पून किसलेले आले, २ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, दीड टीस्पून लाल तिखट, ¼ टीस्पून हळद, मीठ चवीनुसार आणि तळण्यासाठी तेल.

crispy pakoda recipe
Chanakya Niti: श्रीमंत व्हायचंय? मग जाणून घ्या चाणक्यांचे हे ७ नियम, काहीच दिवसात जाणवेल फरक

कृती

एका भांड्यात रवा आणि दही घालून नीट मिक्स करा. हळूहळू पाणी घालत घट्टसर मिश्रण तयार करा आणि ते 10-15 मिनिटं झाकून ठेवा. म्हणजे रवा फुलून येईल. आता त्यात सर्व चिरलेल्या भाज्या, मसाले आणि थोडासा बेकिंग सोडा घालून चांगलं मिक्स करा.

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर छोटे-छोटे पकोडे सोडत तळा. ते सोनेरी आणि खमंग झाले की टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल शोषून घ्या. हे गरमागरम भजी हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा आणि थंडीच्या संध्याकाळी चहाबरोबर या कराऱ्या मिक्स व्हेज सूजी भजीचा आस्वाद घ्या.

crispy pakoda recipe
Relationship Issues: पत्नी असूनही पुरुष परक्या स्त्रीच्या प्रेमात का पडतात? वाचा पुरुषांच्या मनातील रहस्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com