
Cooking Tips : गरमागरम कांदा भजी, बटाटा भजी पाहिली की आपल्या तोंडाला पाणी सुटते. परंतु, वाढत्या महागाईमुळे तेलाचे दर पाहून ते नकोसे वाटते. तसेच अधिक तेलाचे खाल्ले तर अपचन व अॅसिडीटीचा त्रास होतो. वजन देखील वाढते.
भजी बनवणे हे सोपे असले तरी अनेकदा त्याच्या ऑइलपणामुळे ते खाणे टाळले जाते. परंतु, जर काही गोष्टींची काळजी (Care) घेतली तर आपण कमी तेलात क्रिस्पी व टेस्टी अशी भजीची चव चाखू शकतो. तेलाचे प्रमाण, तळताना घ्यावयाची काळजी या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपले आरोग्य देखील नियंत्रणात राहण्यास मदत होईल. कसे ते पाहूया.
1. बेसन पीठ
भजी बनवताना सहसा आपण बेसनाच्या पीठाचा वापर करतो. जर पीठाचे प्रमाण योग्य नसेल तर भजी बनवताना चुकतात. त्यासाठी पीठ हे अधिक जाडसर सुद्धा नको व अधिक पातळ देखील नको. पीठाचे प्रमाण व्यवस्थित असल्यास तळताना ते तेल (Oil) अधिक शोषून घेत नाही.
2. तळण्यासाठी भांडी
जर आपण भजी तळण्यासाठी चुकीच्या भांड्याचा वापर केला तर ते अधिक तेल शोषतात. त्यासाठी तळताना कढईचा तळ हा अधिक जाडसर नसावा. यामुळे तेलाचे तापमान स्थिर राहण्यास मदत होते व तळताना कमी तेलाचा वापर होतो.
3. तेलाचे प्रमाण (quantity)
तळताना आपण कमी किंवा अधिक तेल घालतो. यामुळे जास्त तेल शोषून घेतात. भजी तळताना तेल संपायला लागते. तर भजी एकत्र टाकली की, ती एकमेकांना चिकटतात व त्यांचा थर निघू लागतात. त्यासाठी तेलाचे प्रमाण हे समप्रमाणात असायला हवे.
4. तेल शोषूण घेताना
तळून झाल्यानंतर पॅनमधून बाहेर काढताना चांगले कोरडे करा. ज्या भांड्यात भजी काढणार आहात त्यावर पेपर नॅपकीन ठेवा. त्यामुळे कागद तेल शोषून घेईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.