Dudhi Bhopla Barfi: घरच्या घरी बनवा चविष्ट आणि पौष्टिक दुधी भोपळ्याची बर्फी, पाहा रेसिपी

How To Make Dudhi Bhoplyachi Barfi : घरच्या घरी ट्राय करा दुधी भोपळ्याच्या बर्फीची रेसीपी
Dudhi Bhopla Barfi
Dudhi Bhopla BarfiSaam Tv
Published On

Dudhi Bhopla Barfi Recipe :

जेवण झाल्यावर काहीतरी गोडाचा पदार्थ हवाच असतो. गोडाचा पदार्थ खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. त्यात जर बर्फी किंवा पेढा असेल तर अजूनच मज्जा येते. तसेच बर्फी फक्त जेवणानंतर नव्हे तर कोणत्याही समारंभाला किंवा पाहुणे आल्यावर दिली जाते. अशीच दुधी भोपळ्याच्या बर्फीची रेसीपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की अनेकांना आवडत नाही. मात्र, दुधी भोपळा हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यात अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळेच घरी ही दुधी भोपळ्याच्या बर्फीची रेसीपी नक्की ट्राय करा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य

  • १ किलोग्रॅम- दुधी भोपळा

  • 3/2 कप - दूध (Milk)

  • 3/4 कप - दूध पावडर

  • १ कप - किसलेले खोबरे (Coconut)

  • २ टेबलस्पून- तूप

  • 3/4 कप- साखर (Sugar)

  • खाण्याचा रंग - आवश्यकतेनुसार

Dudhi Bhopla Barfi
Masala Daliya Khichadi Recipe : स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला? ट्राय करा मऊसुत दलिया मसाला खिचडी, पाहा रेसिपी

2. कृती

  • सर्वप्रथम दुधीभोपळा किसून त्यातील बिया काढून टाका.

  • त्यानंतर कढईत १ चमचा तूप टाकून त्यात किसलेला दूधी भोपळा ५-६ मिनिटे परतून घ्या.

  • त्यानंतर त्यात ३ कप दूध घालून २०-२२ मिनिटे शिजवून घ्या.

  • यानंतर त्यात साखर आणि हिरवा फूड कलर घाला. काही मिनिटे साखर विरघळेपर्यंत दूधीभोपळा शिजवून घ्या.

  • त्यानंतर त्यात किसलेले खोबरं टाका आणि मंद आचेवर ८- १० मिनिटे शिजवा.

  • त्यानंतर बर्फीचे मिश्रण एका साच्यात टाकून ३-४ तास आकार येईपर्यंत ठेवा.

  • त्यानंतर त्याचे चौकोनी किंवा आयताकृती तुकडे करा आणि तुमची बर्फी तयार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com