Beetroot Recipes: थंडीत रक्त शुद्ध आणि ग्लोइंग स्कीनसाठी बीटाच्या या रेसिपीज ठरतील बेस्ट, वाचा फायदे
बीट हे पोषणाने समृद्ध मानले जाणारे फळभाजी आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते रक्तप्रवाह आणि रक्तदाब सुधारण्यापर्यंत अनेक महत्त्वाची कामे हे करते. गडद लाल रंग, फोलेट, आयर्न, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन C यांसारख्या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असलेले बीट रक्ताच्या आरोग्यासाठी, ऊर्जा वाढवण्यासाठी आणि त्वचेच्या नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. संशोधनानुसार, बीट हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आणि त्वचेच्या आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.
बीटाचा ज्यूस फक्त नायट्रेट्समुळेच नव्हे तर त्यातील अँटिऑक्सिडंट्स—बेटानिन, फ्लॅवोनॉइड्स आणि व्हिटॅमिन C यांच्या मदतीने हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यात मदत करतो. 2021 मधील एका संशोधनात रोज कच्चा बीटरूट सेवन केल्याने टाइप-2 डायबेटीज असलेल्या व्यक्तींमध्ये चयापचय सुधारणा आणि मेंदूचे कार्य वाढताना दिसून आले.
रक्त शुद्धीकरण आणि त्वचेचा तेज वाढवणाऱ्या दोन सोप्या बीटरूट रेसिपीजदेखील तज्ज्ञांनी सुचवल्या आहेत. पहिली रेसिपी म्हणजे बीटरूट-पोमेग्रॅनेट स्मूदी. उकडलेला छोटा बीटरूट, डाळिंबाचे दाणे, चिया किंवा फ्लॅक्ससीड, नारळ पाणी, किसलेले आले आणि लिंबाचा रस एकत्र ब्लेंड करून तयार होणारी ही स्मूदी पोलीफेनॉल आणि व्हिटॅमिन C ने समृद्ध आहे. तज्ज्ञांच्या मते ही स्मूदी रक्ताभिसरण सुधारते, त्वचेवरील सुरकुत्या कमी करते आणि वयामुळे होणारे नुकसान दुरुस्त करण्यात मदत करते.
दुसरी रेसिपी म्हणजे बीटरूट-मूगडाळ सूप. पिवळी मूगडाळ आणि चिरलेला बीटरूट पाण्यासह प्रेशर कुकरमध्ये शिजवून त्याचे पातळ सूप तयार केले जाते. जिरं, आले आणि हळद परतून त्यात हे मिश्रण ओतले जाते आणि शेवटी लिंबूरस व कोथिंबीर घालून सर्व्ह केले जाते. डॉ. हंसा यांच्या मते, मूगडाळ हे वनस्पतीजन्य प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे, जे त्वचेला मजबुती देते. तर बीटरूट रक्त शुद्ध करत असल्यामुळे त्वचेला नैसर्गिक तेज प्राप्त होते. या नैसर्गिक रेसिपीज योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात समाविष्ट केल्यास रक्ताची शुद्धता, त्वचेचे आरोग्य आणि एकूणच तंदुरुस्ती सुधारण्यास मदत होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

