तुम्ही जर अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तर, हा जबरजस्त जुगाड तुमच्यासाठीच आहे. आपण सर्वजण आपल्या मोबाईलवर व्हिडिओ पाहतो, गाणी, मुलाखती, भाषणं, कथा, बातम्या, पॉडकास्ट ऐकतो. यूट्यूबवर (Youtube) हे सर्व ऐकायचं झाल्यास मोबाईलची स्क्रीन ही चालूच राहते. आपण मोबाईल लॉक (Mobile Screen Lock) केला तर लगेच यूट्यूबही बंद होते. हे टाळण्यासाठी आपण यूट्यूबचे प्रिमियम सबस्क्रीप्शन (Youtube Premium Subscription) घेऊ शकतो ज्याने आपण मोबाईल स्क्रीन बंद असतानाही यूट्यूबरील ऑडियो ऐकु शकतो. (how to listen only audio on youtube) पण यूट्यूबचं सबस्क्रीप्शन विकत घेणं प्रत्येकाला परवडेलचं असं नाही. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी असा एक भन्नाट जुगाड घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमच्याकडे यूट्यूबचं सबस्क्रीप्शन नसलं तरी तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनची (Android SmartPhone) स्क्रीन ऑफ करुन यूट्यूबरील ऑडियो (Youtube Audio) ऐकु शकता. चला तर मग जाणून घेऊयात हा जबरजस्त जुगाड... (How to listen to YouTube with the Screen Off 2022 - New Trick)
हे देखील पहा -
स्टेप १: तुमच्या मोबाईलच्या यूट्यूब ॲप उघडा आणि तुम्हाला हव्या असलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.
स्टेप २: व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ अर्थातच प्ले होईल. या व्हिडिओखाली जी लाल रेष म्हणजे टाईम लाईन दिसेल त्यावरील लाल टिंब म्हणजे कर्सर हा व्हिडिओच्या शेवटाला न्या आणि सोडा (उदा. व्हिडिओ जर ५ मिनिटांचा असेल कर तो ०४:३० सेकंदांपर्यंत स्क्रोल करुन न्या, पुर्ण संपवू नका)
स्टेप ३: यानंतर तो व्हिडिओ मिनीमाईझ करा, म्हणजे हाताने व्हिडिओला खाली खेचा म्हणजे तो छोट्या विंडोमध्ये प्ले होत राहिल.
स्टेप ४: यानंतर सर्वात खाली जिथे यूट्यूब शॉर्ट्सचं बटण असतं ते दाबा आणि ३-४ यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ स्क्रोल करा आणि बॅक करा. (यूट्यूब शॉर्ट्स पुर्ण बघण्याची गरज नाही, फक्त ३-४ वेळा स्क्रोल करा)
स्टेप ५: वरील चारही स्टेप्स झाल्यानंतर शेवटची स्टेप म्हणजे आता तुमच्या मुळ व्हिडिओकडे या जो तुम्ही सुरुवातीलाच ओपन केला होता. त्या व्हिडिओच्या सुरुवातीला जा म्हणजे कर्सर त्या व्हिडिओच्या पहिल्या सेकंदाला न्या. आता मोबाईलचं मधलं बटण (होम बटण) दाबा आणि मोबाईल लॉक करा. स्क्रीन ऑफ झाल्यानंतरही यूट्यूब चालू असेल...
तर आहे ना हा जबरजस्त जुगाड? तुमच्या मोबाईलमध्ये ही ट्रिक काम करते का नाही हे कमेंट्समध्ये नक्की कळवा.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.