Bollywood Movie: ‘गंगुबाई काठियावाडी' वादाच्या भोवऱ्यात; चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी

Upcoming Bollywood Movie Gangubai Kathiawadi: यापुर्वी गंगुबाई यांच्या मुलानेही याबाबत प्रकार दाखल केली होती. पंरतु मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रकरणाला स्थगिती देण्यात आली.
Bollywood Movie गंगुबाई काठियावाडी Controversy
Bollywood Movie गंगुबाई काठियावाडी ControversyInstagram/ @aliaabhatt
Published On

मुंबई: आलिया भट्टची मुख्य भुमिका असलेला संजयलीला भंन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित चित्रपट गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण, या चित्रपटाचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार अमीन पटेल (Amin Patel) यांनी केली आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर (Gangubai Kathiawadi Trailer) रिलीज झाला होता, तेव्हाही अनेकांनी याला विरोध केला होता. आता कॉंग्रेस आमदारानेही या चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. नाव बदलण्याचं काम शासन दरबारी झालं नाही तर आपण कोर्टात जाऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Bollywood Movie ‘Gangubai Kathiawadi’ in controversy; demand to change the name of the movie)

हे देखील पहा -

Bollywood Movie गंगुबाई काठियावाडी Controversy
FIH Pro League: जुगराज सिंगची हॅटट्रीक; टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवर मात

या चित्रपटाचं नाव का बदलण्यात यावं असं विचारलं असता आमदार पटेल म्हणाले की, कामाठीपुरा हा खूप मोठा परिसर आहे, त्यामुळे एका गल्लीमुळे तो संपुर्ण परिसर खराब आहे असं होईल. तसेच चित्रपटाच्या नावामुळे शहराचं नाव खराब होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी आम्ही नाव बदल करण्याची मागणी करत आहोत असं ते म्हटले आहेत. यापुर्वी . गंगुबाई यांच्या मुलानेही याबाबत प्रकार दाखल केली होती. पंरतु मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रकरणाला स्थगिती देण्यात आली. या चित्रपटात गंगुबाईसाठी काही अपमानास्पद शब्द वापरण्यात आले होते असं त्याचं म्हणनं होतं.

पहा ट्रेलर -

हा चित्रपट माफिया क्वीन ऑफ मुंबई (Mafia Queens of Mumbai) या कांदबरीवर आधारीत आहे. येत्या २५ फेब्रुवारीला तो प्रदर्शित होत आहे. यात आलिया भट्टने (Alia Bhatt) गंगुबाई हे पात्र साकारले आहे. गंगुबाई नावाची तरुणी कशाप्रकारे वेश्या व्यवसायात (Prostitution) ढकलली जाते. त्यानंतर ती वेश्यांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी जो लढा देते या सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. मुंबईतील अंडरवर्ल्डचीही (Mumbai UnderWorld) झलक यात दिसेल. या चित्रपटात आलिया भट्टला तगडं आवाहन मिळणार आहे ते विजय राज (Vijay Raj) यांच्याकडून. विजय राज यांनी रझियाबाईचं पात्र साकारलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com