Men Dark Lip Remedies : पुरुषांनो, काळवडलेल्या ओठांपासून त्रस्त आहात ? ओठांचे सौंदर्य गमावल्यासारखे वाटते ? हे घरगुती उपचार करुन पाहाच

How to Lighten Dark Lips: एकीकडे स्त्रिया गुलाबी ओठांसाठी नवनवीन उपाय करत असताना दुसरीकडे पुरुष त्याकडे दुर्लक्ष करतात.
Men Dark Lip Remedies
Men Dark Lip Remedies Saam tv
Published On

Black Lips Cure : स्त्री असो वा पुरुष, ओठांचा काळेपणा कुणालाच आवडत नाही. एकीकडे स्त्रिया गुलाबी ओठांसाठी नवनवीन उपाय करत असताना दुसरीकडे पुरुष त्याकडे दुर्लक्ष करतात. काळे ओठ हे आनुवंशिकता, अस्वास्थ्यकर जीवनशैली व आजारांमुळे होतात.

ओठांचे सौंदर्य सुंदर ठेवण्यासाठी स्त्रिया या काहीना काही करत असतात. पण पुरुष मात्र स्वत:च्या सौंदर्याकडे लक्ष देत नाही. पण पुरुषांनो, तुम्हाला देखील ओठांचे सौंदर्य चांगले हवे असेल तर तुम्ही देखील या टिप्स फॉलो करु शकता. काळवडलेल्या ओठांपासून तुम्ही त्रस्त आहात व गुलाबी ओठ हवे असतील तर तुम्ही हे घरगुती उपाय करुन पाहा.

Men Dark Lip Remedies
Preventing Monsoon Hair Fall : पावसाळ्यात केसगळतीची समस्या वाढते ? मग आहारात या पदार्थांचा समावेश करा, होईल कोंड्यापासून सुटका

पुरुषांनी काळ्या ओठांपासून मुक्त होण्यासाठी काय करावे?

1. लिंबाचा रस :

लिंबू (lemon) एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे, जे ओठांचा काळेपणा दूर करण्यास मदत करते. लिंबाचा रस ओठांवर लावा व १५ मिनिटे ठेवून पाण्याने स्वच्छ धुवा. नियमितपणे केल्याने ओठांचा रंग बदलण्यास मदत होईल.

2. शुगर स्क्रब:

ऑलिव्ह ऑईल किंवा मधामध्ये थोडी साखर (Sugar) मिसळून स्क्रब बनवा. काही मिनिटे ओठांवर हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर धुवा. हे ओठांना एक्सफोलिएट करण्यास आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते.

Men Dark Lip Remedies
Shravan Rashibhavishya 2023 : श्रावणात राशींनुसार करा हे उपाय, होईल महादेवाची कृपा

3. बीटचा रस:

बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि ते काळे ओठ हलके करण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी बीटरूटचा थोडा रस ओठांवर लावा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी उठल्यावर ते धुवावे.

4. काकडी:

काकडीमध्ये (Cucumber) थंड आणि उजळ करणारे दोन्ही गुणधर्म असतात, ज्यामुळे ओठांवर रंगद्रव्य कमी होण्यास मदत होते. काकडीचे गोल काप करुन काही मिनिटे ओठांवर घासा. १० मिनिटांने पाण्याने धुवा.

Men Dark Lip Remedies
Brain Health : मोबाईलच्या अतिवापरामुळे वाढतोय ब्रेन ट्यूमरचा धोका ? जाणून घ्या, याबाबतचे समज-गैरसमज

5. बदामाचे तेल:

बदामाचे तेल व्हिटॅमिन ई मध्ये समृद्ध आहे आणि ते गडद ओठांना मॉइश्चरायझ आणि हलके करण्यास मदत करते. झोपण्यापूर्वी थोडे बदामाचे तेल ओठांवर लावा आणि रात्रभर राहू द्या

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com