
Home Treatments for Gas and Bloating: हल्लीच्या खाण्यापिण्याच्या पध्दती आणि आहारातील वाढता जंक फुडचा वापर यामुळे गॅस आणि अपचनाच्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. गॅस अणि अपचनामुळे आपल्याला आपल्या मनासारखं खाता येत नाही आणि खाल्लेले पचवण्यासाठी अँटासिडची मदत घ्यावी लागते.
1. हिंग
गॅसच्या समस्येवर हिंग हा एक प्रभावी उपाय आहे. जर तुम्हाला जेवल्यानंतर गॅस होत असेल तर गरम पाण्यात (Water) थोडीशी हिंग टाकून प्यायल्याने फायदा होतो.
2. ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर अन्न पचवण्यास मदत करते. त्यामुळे एक ग्लास पाण्यात एक मोठा चमचा व्हिनेगर टाकून प्यायल्याने ते पचनास मदत करते आणि गॅसच्या समस्येपासून सोडवते.
3. ओवा
गॅस आणि ब्लोटिंग च्या समस्येवर ओवा देखील एक फायदेशीर उपाय ठरतो. सकाळी उपाशी पोटी ओव्याचे पाणी घेतल्यास गॅस कमी होण्यास मदत होते.
4. हर्बल टी
काही हर्बल टीच्या सेवनाने गॅसची समस्या दूर होऊ शकतात. आल्याचा चहा, बडीशेपचा चहा, ग्रीन टी प्यायल्याने बध्दकोष्ठतेपासून आणि गॅसपासून आराम मिळतो.
5. जिऱ्याचे पाणी
जिऱ्याचे पाणी हा गॅसच्या सम्येवर एक उत्तम घरगुती उपाय आहे. जे अन्न पचवायला मदत करते. त्यामुळे गॅस झाल्यास एक मोठा चमचा जिर दोन कप पाण्यात 10 ते 15 मिनिट उकळून, थंड करुन घेणे प्यायल्याने आराम मिळतो.
6. आलं
आलं देखील गॅसच्या समस्येवर घरगुती उपाय आहे. एक चमचा आल्याचा किस जेवणानंतर लिंबूच्या रसासोबत घ्यावा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.