Find Lost Smartphone: टाळी आणि शिट्टी वाजवून शोधता येणार हरवलेला फोन, कसे ते जाणून घ्या

Find My Android : अनेकदा प्रवासात किंवा गर्दीच्या वेळी आपला फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही काय कराल?
Find Lost Smartphone
Find Lost SmartphoneSaam tv
Published On

Find Lock Or Erase a Lost Android Device : स्मार्टफोन हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील गरजेची वस्तू. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत याचा वापर आपण अधिक प्रमाणात करत असतो. परंतु, कधीकधी आपल्या निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते.

अनेकदा प्रवासात किंवा गर्दीच्या वेळी आपला फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही काय कराल? तो शोधण्यासाठी आपण Google Find My Device द्वारे शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु, जर आम्ही तुम्हाला असे सांगितले की, टाळी व शिट्टी कळेल. पण इतर काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही टाळ्या वाजवून किंवा शिट्टी वाजवून तुमचा फोन शोधू शकता. आम्ही तुम्हाला असे काही अॅप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने आपण हरवलेला फोन सहज शोधू शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

Find Lost Smartphone
How To Improve Poor Mobile Network : मोबाईलचं नेटवर्क गेलंय? या 5 टिप्स, चुटकीसरशी मिळेल सिग्नल

1. Clap To Find

Clap To Find या अॅपच्या मदतीने आपण आपला हरवलेला फोन (Phone) सहज शोधू शकतो. त्यासाठी आधी हे अॅप फोनमध्ये डाऊनलोड करावे लागेल. टाळ्या वाजल्याने हे अॅप सक्रिय होते. तुमचा फोन ज्या दिशेने हरवला आहे त्याच दिशेने तुम्हाला टाळ्या वाजवाव्या लागतील. यासाठी वापरकर्त्याला एकाच वेळी 3 वेळा टाळ्या वाजवाव्या लागतील. या अॅपमध्ये ध्वनी, व्हायब्रेट आणि फ्लॅश अलर्ट (Alert) मोडचा समावेश असलेले तीन मोड आहेत.

2. Phone clap

हे अॅप देखील पूर्वीसारखेच आहे. जर तुम्ही तुमचा फोन कुठेतरी ठेवला आणि विसरला असाल तर या अॅपची खूप मदत (Help) होऊ शकते. हे अॅप टाळ्यांचा आवाज ओळखते. टाळ्या वाजवल्याने फोनमधील अलार्म वाजू लागतो.

Find Lost Smartphone
How To Set Data Limit Speed : फुल ऑन मजा! दिवसभर कितीही युज करा डेटा,संपणारच नाही; फक्त ही एक सेटिंग ऑन करा

3. Find my phone clap

हे अॅप टाळ्या वाजवण्यापेक्षा शिट्टी वाजवून फोन शोधण्यात मदत करेल. तुम्ही जेव्हाही शिट्टी वाजवाल तेव्हा फोनची रिंगटोन वाजण्यास सुरुवात करेल आणि तुम्हाला तुमचा फोन सहज शोधता येईल. अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यात व्हिसल डिटेक्शन चालू करावे लागेल.

4. Find My Phone Whistle

या अॅपद्वारे तुम्ही शिट्टी वाजवूनही फोन शोधू शकाल. तुम्ही शिट्टी वाजवली की फोन वाजायला लागतो. जर तुमचा फोन कार किंवा ऑफिसमध्ये कुठेतरी हरवला असेल तर तुम्हाला फक्त शिट्टी वाजवावी लागेल

Find Lost Smartphone
Deepa Parab: तुझं असं सौंदर्य पाहून सारं रान झालं हिरवं

5. Family Locator - GPS Tracker

हे अॅप थोडे वेगळे आहे. हे GPS वर काम करते. जर फोन घरामध्ये हरवला असेल तर तुम्ही त्याचा सहज मागोवा घेऊ शकता. हे अॅप Android आणि iOS वर काम करते. त्याची वेबसाइट व्हर्जनही बनवण्यात आली आहे. याच्या मदतीने फोन रिअल टाइममध्ये शोधता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com