Home Remedies : जवळजवळ प्रत्येक घरात चांदीच्या वस्तू असतात. काही काळानंतर त्या वस्तू काळ्या पडायला लागतात त्यासाठी आपण कितीही काळजी घेतली तरी त्याची चमक हळूहळू कमी होते.
चांदीच्या वस्तू एकदा काळा पडल्या कितीही प्रयत्न करून ती साफ होत नाही त्यामुळे आपण दागिन्यांना पॉलिश करण्यासाठी देतो ज्यामध्ये खूप पैसे जातात. त्यामुळे तुम्ही घरगुती उपाय करून चांदीच्या वस्तू सहज चमकवू शकता सोबतच तुमचे पैसेही वाचतील.
1. हॅण्ड सॅनिटायझरचा वापर
कोरोना (Corona) काळापासून हॅण्ड सॅनिटायझर सर्वच लोकांच्या वापरात आला आहे. सॅनिटायझर चे काम केवळ जंतूंशीच लढणे नसून याचा वापर करून चांदीवरून डाग आणि धूळ साफ करण्यासाठी देखील करू शकतात. एका स्वच्छ कापडात सॅनिटायझरचे ३/४ थेंब टाकून चांदीची वस्तू घासून घ्या. दहा मिनिटांनी तुम्हाला फरक जाणवेल.
2. टूथपेस्टचा वापर
घरातील चांदीच्या वस्तू चमकवण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकतो. टूथपेस्ट सर्वांच्याच घरात उपलब्ध असते त्यामुळे चांदी साफ करण्यासाठी जास्त अडचण येणार नाही. टूथब्रशवर टूथपेस्ट लावून चांदीवर घासायला सुरू करा काही वेळानंतर कोमट पाण्यात चांदी भिजवून ठेवा.काही मिनिटे झाल्यावर स्वच्छ (Clean) पाण्याने (Water) चांदी धूवून कोरड्या कापडाने पुसून घ्या.
3. केचपने चांदीच्या वस्तू स्वच्छ करू शकता
केचपने चांदीच्या वस्तू साफ करण्यासाठी तुम्हाला फक्त कागदाच्या टॉवलमध्ये केचप घ्यायचे आहे आणि चांदीवर काळा झालेल्या भागावर घासायचे आहे.जर चांदी स्वच्छ नाही झाली तर पंधरा मिनिटापर्यंत केचप चांदीवर राहू द्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने साफ करा.
4. बेकिंग सोडा आणि अँल्युमिनियम फॉईल
चांदी साफ करण्यासाठी बेकिंग सोडा उत्तम पर्याय आहे.याचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम पाणी उकळून घ्या. त्यानंतर चमकणारी बाजू वरच्या बाजूला ठेवून अँल्युमिनियम फॉईलची रेषा करा. आता एका भांड्यात एक चमचा खाण्याचा सोडा, एक कप पाण्यात टाकून त्यात काळया झालेल्या चांदीच्या वस्तू टाकून साधारण पाच मिनिटे असेच राहू द्या. पाच मिनिटे झाल्याने वस्तू बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवा त्यानंतर एका कापडाने पुसून घ्या. चांदीच्या वस्तू चमकायला लागते.
5. लिंबू आणि मिठाचा वापर
लिंबू आणि मिठाचा वापर करून जर तुम्हाला चांदी चमकवायची असेल तर त्यासाठी एका भांड्यात तीन टेबलस्पून मीठ आणि कोमट पाणी घालून आता त्यात लिंबू पिळून घ्या.या तयार द्रावणात चांदीची नाणी, ताठ,चमचे आणि इतर कोणत्याही चांदीच्या वस्तू ठेवून दहा मिनिटांसाठी या द्रावणात राहू द्या. त्यानंतर बाहेर काढून एका मग कापडाने पुसून घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.