Aadhar Card Photo Update : आधार कार्ड वरील फोटो कसा बदलाल ? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप

Aadhar card photo change process : आधार कार्ड हे सध्या आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण आहे.
Aadhar Card Photo Update
Aadhar Card Photo UpdateSaam Tv
Published On

How To Change Your Photo In Aadhar Card : आधार कार्ड हे सध्या आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक महत्त्वाच्या बाबीत त्याच्या हमखास वापर केला जातो. परंतु त्याच्यावर असणारा फोटो पाहून आपल्या कधी कधी खूप राग येतो.

सहसा, अशा तक्रारींमध्ये फोटो (Photo) अस्पष्ट आणि जुन्यापणाशी संबंधित गोष्टींचा समावेश होतो. बहुतेक वापरकर्ते त्यांचे स्वतःचा फोटो अनेक वेळा ओळखू शकत नाहीत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला आधार कार्डवरील जुना फोटो कसा बदलू शकतो हे सांगणार आहोत.

Aadhar Card Photo Update
Aadhar Card And Mobile No. Linked : आता फोन नंबरवरुन होणार आधार कार्ड लिंक ! कोणत्याही कागदपत्रांची भासणार नाही आवश्यकता...

1. आधार कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज का आहे ?

  • आधार कार्ड (Aadhar card) हे आजच्या काळात आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते.

  • अनेक छोटी-मोठी कामे पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड सोबत असणे अत्यंत गरजेचे आहे.

  • शिधापत्रिका काढण्यापासून ते बँक खाते उघडण्यापर्यंत किंवा सिमकार्ड मिळवण्यापर्यंत आधारकार्ड सोबत असणे अत्यंत आवश्यक आहे.

  • एवढेच नाही तर आजच्या काळात मुलांच्या (Child) शाळेत प्रवेश घेण्यासाठी आणि इतर अनेक ठिकाणी सरकारी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे.

2. आधार कार्डमध्ये फोटो बदलता येतो का ?

  • आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरले जाते. आधार कार्डमध्ये 12 अंकी क्रमांक आणि तुमची माहिती असते. यासोबत तुमचा फोटोही जोडला आहे.

  • आधार कार्डवरील फोटो अस्पष्ट किंवा जुना असल्यास, तुम्ही स्वतःला ओळखू शकत नाही.

  • अशा परिस्थितीत जुना फोटो बदलून चांगल्या दर्जाचा नवीन फोटो लावणे गरजेचे आहे.

  • युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी ऑनलाइन सुविधा प्रदान करते.

  • मात्र, फोटो बदलण्यासाठी तुम्हाला आधार केंद्र किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल

Aadhar Card Photo Update
Indian Marriage Rituals : लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात?

3. अशाप्रकारे बदलता येईल आधार कार्डवरील फोटो

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर लॉग इन करा. आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करा.

  • फॉर्म भरा आणि जवळच्या आधार केंद्रावर सबमिट करा.

  • आधार केंद्रावर जाऊन तुमचा बायोमेट्रिक तपशील द्या.

  • त्यानंतर कर्मचारी तुमचा दुसरा फोटो क्लिक करेल. यासोबतच तुम्हाला फी देखील जमा करावी लागणार आहे.

  • यानंतर तुम्हाला URN सोबत एक स्लिप मिळेल.

  • या यूआरएन नंबरच्या मदतीने तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचा फोटो बदलला आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.

  • प्रक्रियेनंतर, तुम्ही नवीन फोटो UIDAI वेबसाइटवर पाहू शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com