CBSE Grade System : 10 वी-12 वी च्या बोर्डाचा निकाल मार्कांशिवाय कसा काढला जाईल? कसे असेल कॅलक्युलेशन, वाचा एका क्लिकवर

CBSE 10th-12th Board Result : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE)ने पारंपारिक ग्रेडिंग सिस्टम रद्द करुन टक्केवारी अर्थात १० वी आणि १२ वी बोर्डाच्या निकालांमध्ये मार्क्स जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता CGPA (Cumulative Grade Point Average)म्हणजेच CBSE निकालात ग्रेड पॉइंट्स दिले जातील.
CBSE Grade System
CBSE Grade SystemSaam Tv
Published On

How To Calculate CBSE Grade Point :

लवकरच दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा सुरु होईल. त्यानंतर काही दिवसांत निकालही लागेल. परंतु, यंदा सरकारने १० वी १२ वी बोर्डाच्या निकालांमध्ये अनेक फेरबदल केले आहेत.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE)ने पारंपारिक ग्रेडिंग सिस्टम रद्द करुन टक्केवारी अर्थात १० वी आणि १२ वी बोर्डाच्या निकालांमध्ये मार्क्स जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता CGPA (Cumulative Grade Point Average)म्हणजेच CBSE निकालात ग्रेड पॉइंट्स दिले जातील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. CBSE च्या मार्क्स चे कॅलक्युलेशन का बदलण्यात येत आहे?

CBSE परीक्षा (Exam) नियंत्रक संयम भारद्वाज म्हणतात की, सध्याचे युग हे स्पर्धात्मक आहे. त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावाचा (Mental Health) सामना करतात. त्यामुळे चुकीचे पाऊल देखील उचलतात. त्यामुळे मार्कांऐवजी ग्रेडिंग पॉइंट सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व विषयांचे मार्क्स जोडून निकाल काढण्याऐवजी विद्यार्थांच्या (Student) प्रत्येक विषयातील कामगिरीवर लक्ष केंद्रित करुन टक्केवारी काढण्यात येईल. ज्यातून CGPA काढला जाईल. यामुळे मुलांची कार्यक्षमता कशी सुधारेल आणि त्यांच्यावर कोणताही दबाव येणार नाही.

CBSE Grade System
Career After 12th : शिक्षक बनण्यासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याची आता गरज नाही! बारावीनंतर करा हा कोर्स, प्रोसेस काय?

2. CGPA म्हणजे काय?

CGPA म्हणजे क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट्स एव्हरेज. याचे कॅलक्युलेशन हे सहा अतिरिक्त विषय वगळून सर्व विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ग्रेडच्या गुणांची सरासरी आहे. यामध्ये प्रत्येक विषयांसाठी विद्यार्थ्यांची ग्रेड पॉइंट सरासरी (GPA)काढली जाते.

3. CBSE मार्क्सचा CGPA कसा काढायचा?

CBSE १० वी-१२ वी बोर्डाच्या निकालात दिलेल्या एकूण विषयानुसार ५ सर्वोत्तम विषयाला भागून CGPA काढला जातो. कॅलक्युलेशन कसे असेल पाहूया. जर तुम्हाला ३ विषयांमध्ये ८ ग्रेड पॉइंट असेल आणि एका विषयात ९ तर उर्वरित विषयात ८ पॉइंट असतील तर त्याचा एकूण ग्रेड पॉइंट ४० येईल. त्याला ५ ने भागल्यास ८.० CGPA मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com