Breakup Tips: पार्टनरला न दुखावता कसं कराल ब्रेकअप? या सोप्या टीप्स करतील तुमची मदत

संबंध संपवणे ही अत्यंत संवेदनशील गोष्ट असते. चुकीच्या पद्धतीने ब्रेकअप केल्यास दोघांनाही मानसिक त्रास होऊ शकतो. तज्ज्ञ सांगतात की, योग्य पद्धतीने आणि संवेदनशीलतेने ब्रेकअप केल्यास जोडीदाराला कमी दुखावून संबंध संपवता येतात.
How to heal after being cheated on
How to heal after being cheated onSaam TV
Published On

आजच्या काळात नातं जपणं हे फार महत्त्वाचं आहे. एखादं नातं दीर्घकाळ टिकवणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. अनेकदा रिलेशनशिप्समध्ये ताण, टेन्शन, तणाव आणि टॉक्सिसिटी इतकी वाढते की कपलकडे ब्रेकअक केल्याशिवाय कोणता पर्याय उरत नाही. कोणतंही नातं संपवणं हे सोप नाहीये, पण परिस्थिती पाहता ते टिकवणं देखील कठीण होतं.

अशामध्ये आपल्यापैकी बरेच जण असे असतात ज्यांना नातं तोडायचं असतं मात्र बोलणं फार कठीण जातं. 'मी माझ्या पार्टनरशी ब्रेकअप कसं करू?' असे प्रश्न अनेकदा समोर येतात. यासाठी आम्ही तुम्हाला काही ५ टीप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला न दुखावता ब्रेकअप करू शकता.

पर्सनली बोलून गोष्टी सांगा

जर तुम्ही ब्रेकअप करण्याचा विचार केला असेल, तर तुमच्या जोडीदाराशी नेहमी समोरासमोर बोला. चार चौघांमध्ये किंवा सार्वजनिकरित्या बोलणं टाळा. असं केल्याने समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. यावेळी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि तुमचे विचार स्पष्टपणे व्यक्त करा.

How to heal after being cheated on
Bowel Cancer: पोटदुखी, थकवा की आणखी काही... कॅन्सरची नेमकी लक्षणे कोणती? तज्ज्ञांनी काय सांगितलं?

भांडण करू नका

ब्रेकअप दरम्यान दुःखी होणं सामान्य आहे. या काळात तुम्हाला किंवा दुसऱ्या व्यक्तीला राग येऊ शकतो. मात्र राग टाळण्यासाठी परिस्थिती सकारात्मक पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करा. भांडण करूनह कधीही नातं संपवू नका.

पार्टनरचा अपमान करू नका

ब्रेकअपनंतर कधीही तुमच्या पार्टनरचा अपमान करू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, नातं संपण्यापूर्वी त्या व्यक्तीचं तुमच्या आयुष्यात एक विशेष स्थान होतं. त्यामुळे नेहमी प्रत्येक गोष्टीत समोरच्या व्यक्तीचा आदर करा.

How to heal after being cheated on
Liver failure skin symptoms: तुमच्या त्वचेवर 'हे' 5 मोठे बदल दिसले तर समजा लिव्हर होतंय खराब; वेळीच व्हा सावधान

पार्टनरचं नीट ऐकून घ्या

ज्यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी ब्रेकअप करता तेव्हा फक्त तुमचं मत व्यक्त करून नातं संपवून टाकू नका. यामध्ये तुमच्या जोडीदाराला बोलण्याची संधी द्या आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा.

How to heal after being cheated on
Skin cancer symptoms: त्वचेवर अचानक ही ५ लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध, असू शकतो कॅन्सरचा धोका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com