Thyroid Insomnia Issue : वेळेवर झोप लागत नाहीये? असू शकतो हा गंभीर आजार, वेळीच व्हा सावध

Thyroid Problems : रात्री वारंवार जाग येणे, थकवा, वजनात बदल किंवा बेचैनी हे थायरॉईडच्या समस्येची लक्षणे असू शकतात. झोपेचा त्रास वारंवार होत असल्यास तज्ज्ञ सल्ला घ्या.
Hyperthyroidism and insomnia symptoms
Hyperthyroidism and insomnia symptomsGOOGLE
Published On

झोप ही शरीरासाठी अत्यंत महत्वाची असते. झोपेवरुन तुमचा संपूर्ण दिवस कसा जाणार हे ठरते. पण तुम्हाला झोपेच्या काही समस्या जाणवत असतील, तर हे लक्षण एखाद्या आजाराचे सुद्धा असू शकते. बऱ्याच जणांना विशेषत: महिलांना रात्री लवकर झोप लागत नाही. ही कधीकधी सामान्य वाटणारी समस्या असते. जर ही समस्या वारंवार होत असेल तर त्याचे रुपांतर काही आजारात होऊ शकते.

तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार जवळपास प्रत्येक तिसऱ्या प्रौढ व्यक्तीला रात्री झोप न टिकण्याची समस्या आहे. वारंवार अलार्म वाजण्यापूर्वीच जाग येत असल्यास हा योगायोग नसून आरोग्याशी निगडित गंभीर बाब असू शकते. यामागे थायरॉईड ग्रंथीची कार्यप्रणाली कारणीभूत असू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.

मानेला असलेली थायरॉईड ग्रंथी हार्मोन्स तयार करून शरीराचा मेटाबॉलिझम, हृदयाचे ठोके, शरीराचे तापमान, ऊर्जा पातळी, मेंदूचे कार्य आणि मूड नियंत्रित करते. थायरॉईडचे हार्मोन्स असंतुलित झाल्यास झोपेचे चक्र विस्कळीत होते. ओव्हरअॅक्टिव्ह थायरॉईड म्हणजेच हायपरथायरॉईडिझम असल्यास व्यक्तीला सतत लवकर जाग येऊ शकते आणि पुन्हा झोप लागत नाही. उलट थायरॉईड कमी कार्यरत असल्यास, म्हणजे हायपोथायरॉईडिझममध्ये, सतत थकवा जाणवतो.

Hyperthyroidism and insomnia symptoms
Fatty Liver Symtoms : फॅटी लिव्हरचे सुरुवातीचे संकेत हातावर! या सामान्य लक्षणांना दुर्लक्ष करु नका

तज्ज्ञांच्या मते, आपल्या शरीराचे नैसर्गिक झोपेचे जागृती चक्र म्हणजे सर्केडियन रिदम हे थायरॉईड हार्मोन्सशी निगडित आहे. या हार्मोन्समध्ये बिघाड झाल्यास झोपेचा वेळ विस्कळीत होते. हायपरथायरॉईडिझम असताना शरीरातील कॉर्टिसोलचे संतुलन बिघडते, ज्यामुळे लवकर जाग येऊन बेचैनी जाणवते. तसेच थायरॉईडच्या समस्येमुळे लवकर जाग येण्यासोबतच थकवा, वजनात वाढ, वारंवार थंडी वाजणे किंवा गरम जाणवणे, मासिक पाळीमध्ये अनियमितता, स्नायू दुखी, ब्रेन फॉग, त्वचा कोरडी होणे, भुकेत बदल अशा इतर लक्षणेही दिसून येतात. त्यामुळे असा त्रास वारंवार होत असल्यास थायरॉईड तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

Hyperthyroidism and insomnia symptoms
Farmers Scheme: चंद्रपूर जिल्हा बँकेची शेतकरी कल्याण योजना सुरू; वाचा संपूर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com