Relationship Tips : तु लग्न कधी करणार? नातेवाईकांच्या प्रश्नांनी वैतागले आहात? या पद्धतीने करा गोष्टी हॅन्डल

Annoying Relatives : मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाचे वय उलटू लागले की, घरच्यांपेक्षा नातेवाईकांना अधिक चिंता वाटू लागते. त्यात भर घालणारे आपले शेजारी देखील असतात. मुलगी वयात आली की, सारखा विचारला जाणारा एकच प्रश्न असतो. तु लग्न कधी करणार?
Relationship Tips
Relationship TipsSaam Tv
Published On

How do you deal with relatives when they are asking for marriage :

मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाचे वय उलटू लागले की, घरच्यांपेक्षा नातेवाईकांना अधिक चिंता वाटू लागते. त्यात भर घालणारे आपले शेजारी देखील असतात. मुलगी वयात आली की, सारखा विचारला जाणारा एकच प्रश्न असतो. तु लग्न कधी करणार?

लग्न (Marriage) किंवा कोणत्याही समारंभात गेल्यानंतर नातेवाईक आपल्या घरच्यांना स्थळ सुचवतात किंवा आपल्याच थेट प्रश्न विचारतात. अशावेळी आपली चिडचिड होणे स्वाभाविक आहे. अशी परिस्थिती जर तुमच्या वारंवार येत असेल तर कशाप्रकारे हॅन्डल कराल जाणून घेऊया.

1. दुर्लक्ष करा

लग्नाच्या वयात आल्यानंतर काही कारणांमुळे आपल्याला लग्न करण्याची इच्छा नसते. अशावेळी नातेवाईक अधिक टोमणे मारु लागतात. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेले केव्हाही चांगले. कारण तुम्ही त्यांना जितकी उत्तर द्याल तितके ते अधिक प्रश्न विचारु लागतील.

Relationship Tips
Relationship Tips : नवऱ्याने बायकोसमोर रडणं कितपत योग्य? याचा नात्यावर परिणाम होतो का? जाणून घ्या

2. भूमिका प्रेमाने मांडा

लग्न करायचे की, नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु कोणाच्या दबावाखाली येऊन लग्न करण्याचा निर्णय घेऊ नका. अशावेळी घरच्यांना (Family) किंवा नातेवाईकांना प्रेमाने समजवून तुमचे मत मांडा.

3. नातेवाईकांचा आदर करा

प्रत्येक नात्यात स्वत:च्या अशा मर्यादा असतात. त्यामुळे नात्यात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांचा आदर करणे खूप गरजेचे आहे. अशावेळी नातेवाईकांनी काही गोष्टींची काळजी (Care) घ्यायला हवी.

Relationship Tips
Relationship Tips : प्रेम की, आकर्षण? कसे कळेल तुमच्या नात्यातील अंतर

4. उत्तर देणे महत्त्वाचे

वारंवार सांगूनही जर तुमचे नातेवाईक टोमणे मारत असतील तर अशावेळी त्यांना थांबवणे गरजेचे आहे. समर्पक अशी उत्तर द्या. स्वत:चा मूड खराब करुन घेण्याऐवजी तो आणखी कसा सुधारता येईल यावर लक्ष द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com