AC Fire Safety: ACमुळे आग अन् गुदमरून मृत्यू! बंद खोल्यांमधल्या या चुका ठरतील जीवघेण्या, वेळीच व्हा सावध

Electrical Safety: उन्हाळ्यात ACचा वापर करताना सुरक्षा महत्वाची आहे. जर त्यात काही बिघाड झाला तर आगीचा धोका वाढतो. त्यामुळे खबरदारी घेतल्या पाहिजेत.
air conditioner risk
AC fire safetygoogle
Published On

वाढत्या उन्हामुळे आपण दिवसभर घरामध्ये AC लावून बसतो. काहीजण दिवसभर कामानिमित्त बाहेर जरी असले तरी रात्रीच्या वेळेस ACचा वापर केला जातो. रात्री लावलेली AC आपण थेट दुसऱ्यादिवशी उठल्यावर बंद करतो. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

दिल्लीमधील विवेक विहार परिसरात भीषण आग लागली आणि ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामागचं कारण सुद्धा ACमधील बिघाड हे असण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. यापुर्वीही अशा घटना घडल्या आहेत. मग यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

air conditioner risk
Oxygen Deficiency : Heart Alert! ह्रदयाला ऑक्सिजन कमी पडतंय? ५ धोकादायक लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

AC मध्ये प्लास्टिकचे भाग, वायरिंग आणि विविध इलेक्ट्रॉनिक घटक असतात. एखादा तांत्रिक बिघाड झाला किंवा ओव्हरलोडिंग झालं तर त्यातून आगीच्या ठिणग्या यायला सुरुवात होते. एकदा आग लागली तर ती काही सेकंदांतच खोलीत धूर पसरतो. कधीकधी चांगल्या कूलिंगसाठी खोली पूर्णपणे बंद ठेवतात, पण हीच गोष्ट जीवघेणी ठरू शकते.

बंद खोलीत धूर साचल्यावर ऑक्सिजनची मिळत नाही. त्यामुळे कार्बन मोनोऑक्साइडसारख्या विषारी वायूमुळे माणसाचा दम घुटतो. झोपेत असलेल्या लोकांना याची जाणीवही होत नाही आणि काही मिनिटांतच परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकतो. त्यामुळे ACचा वेळेवर सर्व्हिसिंग करा. जुनी वायरिंग, ओव्हरलोडिंग याकडे लक्ष द्या.

तसेच घरामध्ये फायर अलार्म किंवा स्मोक डिटेक्टर बसवणं खूप महत्त्वाचं ठरतं. अशा उपकरणांमुळे धूर किंवा आग लागताच लगेचच इशारा मिळतो आणि वेळेत बाहेर पडण्याची संधी मिळते. तसेच फायर सेफ्टी बॉलसारखी साधनंही घरात ठेवणं फायदेशीर ठरू शकतं. बॉल स्वत: सक्रीय होऊन आग नियंत्रणात आणतो.

air conditioner risk
Maharashtra Weather Update : मोठी बातमी! राज्यात आजपासून मान्सूनपुर्व पावसाला सुरूवात, वाचा हवामान विभागाने काय वर्तवला अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com