Recipes for Weight Loss: 'ही' स्पेशल डिश झटक्यात वजन करेल कमी; जान्हवी कपूर करते आहारात समावेश

Weight Loss: वजन वाढायला ऋतू लागत नाही. मात्र ते कमी करण्यासाठी आपल्याला ऋतूनुसार आहार घेणे महत्वाचे आहे.
sweet potato recipe
Recipes for Weight Loss:yandex
Published On

वजन वाढायला ऋतू लागत नाही. मात्र ते कमी करण्यासाठी आपल्याला ऋतूनुसार आहार घेणे महत्वाचे आहे. सध्या हिवाळ्याने मुंबई चांगलीच थंड गार केलीये अशा वेळेस आपण शरीराला उष्णता मिळेल असा आहार घेतला पाहिजे. त्यात रताळे, नाचणी, पांढरे तीळ, साजूक तूप, आवळा, गाजर असे पदार्थ खाल्याने आपल्या आरोग्याला भरपुर उष्णता मिळते. तसेच सेलेब्रिटी जान्हवी कपूर नेहमी तिच्या डाएट संदर्भात चाहत्यांच्या चर्चेत येत असते.

जान्हवी कपूरने अनेक डाएटचे व्हिडिओ केले आहेत. त्यातचं व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेने तिच्या हिवाळ्याच्या डाएटमधला एक पदार्थ ऑर्डर केला आहे. त्यात तिने रताळ्यापासून एक सोप्पा आणि चटपटीत पदार्थ तयार केला आहे. चला तर जाणून घेऊ रताळ्यापासून तयार होणारी सिंपल रेसिपी.

सिक्रेट डाएट रेसिपीचे साहित्य

२ कप पाणी

मीठ

२ कप नाचणीचे पीठ

३ चमचे पांढरे तीळट

रताळे उकडवून मॅश केलेले

१ चमचा आले बारीक केलेले

१ चमचा जिरेपूड

कोथिंबीर

साजूक तूप

२ हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या

sweet potato recipe
Weight Loss : वजन कमी करायला दररोज 10 हजार नाही तर, इतकी पाऊले चालणे महत्वाचे आवश्यक

कृती

सर्वप्रथम पाणी उकळून घ्या. त्यात मीठ, पांढरे तीळ, साजूक तूप पाण्यात मिक्स करा. आता नाचणीच्या पीठात ते पाणी वापरून कणीक मळा. आता ते १० मिनिटे झाकून ठेवा. आता उकळलेले रताळे घ्या त्यात कोथिंबीर, किसलेलं आलं, जिरेपूड, मिरच्या हे मिक्स करा. हे स्टफींग आता तयार आहे.

आता नाचणीच्या मळून घेतलेल्या कणकेचा एक गोळा घ्या आणि त्यात स्टफींगभरा. आता हलक्या हाताने चपाती सारखे लाटा आणि छान गरम तव्यावर शेकवा. त्यावर तुम्ही तुपाचा एक चमचा फिरवा आणि गरमागरम पराठा सर्व्ह करा.

रताळ्याचा पराठा खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम लोणचं, दही, हिरवी चटणी किंवा सॉससोबत हा गरमागरम पराठा खाण्यासाठी सर्व्ह करा.

sweet potato recipe
Green leafy vegetables : थंडीत 'या' हिरव्या पालेभाज्या खाण्याने लांब होतील आजार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com