Winter diet
Green leafy vegetables benefits google

Green leafy vegetables : थंडीत 'या' हिरव्या पालेभाज्या खाण्याने लांब होतील आजार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Winter Diet : तुम्ही फक्त हिवाळ्यातच नाही तर इतर ऋतूंमध्ये सुद्धा हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करू शकता.
Published on

Green Vegetables : हिवाळ्यात थंडी ही जास्त प्रमाणात असते ती आपल्या शरीराला जाणवते. आपल्या शरीरावर तिचा जास्त परिणाम होतो. त्यावेळेस जर आपण चांगले अन्न खाल्ले नाही तर आपण आजारी पडू शकतो. तसेच आपण कोणत्याही वातावरणार राहू शकत नाही. अशा वेळेस आपण शरीरातली ऊर्जा वाढवणे. त्याचसोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे महत्वाचे असते त्यासाठी भाज्या खाणे खूप आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्यांमधून आपल्याला अनेक पोषक घटक मिळतात. त्याने आपण आजारांपासून लांब राहतो.

तुम्ही फक्त हिवाळ्यातच नाही तर इतर ऋतूंमध्ये सुद्धा हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करू शकता. आता बरीच मंडळी अशी असतात की त्यांना पालेभाज्या आवडत नाहीत. मग त्यांनी पालेभाज्यांचे वेगवेगळे पदार्थ तयार करून खाऊ शकता. जसे की, विविध भाज्यांचा वापर करून तयार केलेले सूप किंवा पराठे. आता आपण हिरव्या पालेभाज्या का खाव्यात? याचे गंभीर परिणाम काय होतील हे पाहणार आहोत. दी इंडियन एक्सप्रेसने नवी दिल्ली येथील अरोलो हॉस्पिटलचे न्युट्रिशनिस्ट नारंग यांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे.

Winter diet
Palak Recipes: मुलं खात नाहीत पालेभाज्या? आता नो टेंशन; ट्राय करा 'ही' सोपी रेसिपी

आरोग्यासाठी पालेभाज्याच का?

हिरवी गार पालक

पालकची भाजी सगळ्यांना नकोशी असते. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात लोह, व्हिटॅमिन्स आणि फोलेट असतात. त्याने तुम्हाला सहसा कोणत्याच रोगाची लागण होणार नाही. तसेच या भाजीत ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे तुमचे डोळे चांगले राहतात. तसेच थंडीमध्ये शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी पालक खूप महत्वाची असते.

केल पालेभाजी खाण्याचे फायदे

केल ही पालकासारखीच दिसणारी पालेभाजी आहे. ही आरोग्यासाठी अत्यंत पौष्टीक पालेभाजी आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, आणि के भरपुर प्रमाणात असतात. या भाजीमध्ये भरपुर कॅल्शियम असतात. त्याचा फायदा आपली हाडे मजबूत करण्यासाठी होतो.

मोहरीच्या पानांची भाजी

मोहरीच्या पानांची भाजी भारतीय लोक खूप जास्त प्रमाणात करतात. यात सी, के आणि बीटा-कॅरोटीन ही व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. मोहरीच्या हिरव्या भाज्यांमध्ये सल्फरयुक्त संयुगे असतात. जी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून कार्य करतात.

राजगिराच्या पानांची भाजी

लाल पालक म्हणजेच राजगिराची पाने. ही भाजी हिवाळ्यात तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होईल. त्यामध्ये लोह, कॅलशियम आणि पोटॅशियमच प्रमाण जास्त असते. त्याने हाडे मजबूत होतात आणि पचनक्रिया सुधारते.

Winter diet
Winter Health : थंडीत घाम न येणं ठरू शकतं धोक्याचं; ब्रेन स्ट्रोक सारखे आजार लागतील मागे, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com