सर्दी-खोकला झाल्यावर आलं आणि तुळशीचा चहा पिणे हा आपल्याकडे अत्यंत लोकप्रिय घरगुती उपाय आहे. यामुळे घशाला तात्पुरता आराम नक्की मिळतो आणि अस्वस्थता कमी होते. मात्र, हा चहा सर्दी-खोकल्यावर खरोखरच प्रभावी औषध आहे का?
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, आल्यामध्ये जिंजरॉल्स सारखे सक्रिय घटक आढळतात. तसेच तुळशीमध्येही अनेक बायो-ॲक्टिव्ह घटक असतात. परंतु, यापैकी कोणत्याही वनस्पतीपासून बनवलेल्या चहाचे सेवन सर्दी किंवा खोकल्यावर प्रभावीपणे उपचार करू शकते, याचे कोणतेही पुरेसे वैज्ञानिक पुरावे नाहीत.
ही चहा शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करू शकते. तसेच गरम पेयांमुळे घशातील खवखव आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. या चहामध्ये मध मिसळल्याने खोकला कमी होण्यास मदत होऊ शकते.
कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे
आल्यामुळे अनेकांना अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते.
सर्दी-खोकल्यासोबतच श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे किंवा सतत उच्च ताप असणे अशा लक्षणांमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आलं-तुळशीची चहा सामान्य सर्दी-खोकल्यामध्ये आराम देणारा एक घरगुती पर्याय असू शकतो, परंतु पुरेशी विश्रांती घेणे आणि गरज भासल्यास योग्य वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे.
आले-तुळशीच्या चहाचे सेवन संतुलित प्रमाणातच केले पाहिजे आणि त्याकडे औषधांचा पर्याय म्हणून पाहू नये.
सामान्य सर्दी-खोकला सहसा काही दिवसांत बरा होतो, परंतु लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिल्यास किंवा प्रकृती बिघडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
टीप: या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.