घरच्या घरी बनवा नॅचरल फ्लोअर क्लीनर: फरशी चमकेल काचेसारखी

natural floor cleaner : रोज लादी पुसूनही फरशीवर चिकटपणा किंवा पायाचे डाग राहतात? महागडे क्लीनर आणण्याऐवजी घरातल्याच काही सोप्या गोष्टी वापरून तुम्ही फरशी काचेसारखी चकचकीत बनवू शकता.
MAKE YOUR FLOORS SPARKLE NATURALLY WITHOUT EXPENSIVE CLEANERS
MAKE YOUR FLOORS SPARKLE NATURALLY WITHOUT EXPENSIVE CLEANERS SAAM TV
Published On: 

रोज घराची स्वच्छता करूनही अनेकदा फरशी हवी तशी चमकदार दिसत नाही, कुठे पायाचे डाग राहतात तर कुठे लादी पुसल्यानंतरही फरशीवर चिकटपणा जाणवतो. अशा वेळी महागडे मजला साफ करणारे क्लीनर आणण्याऐवजी घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून तुम्ही फरशी काचेसारखी चमकवू शकता.

एकाच बादलीतील घाणेरड्या पाण्याचा वारंवार वापर केल्याने घाण सगळीकडे पसरते, तसंच किचनमधील तेलाचे डाग, बाहेरून आलेली माती आणि ओलावा यामुळे फरशी चिकट होते व दुर्गंधी येते.

MAKE YOUR FLOORS SPARKLE NATURALLY WITHOUT EXPENSIVE CLEANERS
Sunflower Seeds : दुध आणि मांसाहारापेक्षा जास्त ताकद,'या' बिया ठरतील आरोग्यासाठी वरदान

हे घालवण्यासाठी बादलीत कोमट पाण्यात पाव कप पांढरा व्हिनेगर आणि एक छोटा चमचा लिक्विड डिश सोप व्यवस्थित मिसळून घ्या. सोबतच छान सुगंधासाठी तुम्ही १० ते १५ थेंब इसेन्शियल ऑइलसुद्धा घालू शकता. या द्रावणात कपडा चांगला बुडवून व्यवस्थित पिळून घ्या आणि मगच फरशी पुसा.

MAKE YOUR FLOORS SPARKLE NATURALLY WITHOUT EXPENSIVE CLEANERS
जिवलग जिवाच्या मित्रालाही सांगू नका तुमच्या आयुष्याच्या या ५ गोष्टी, अन्यथा डोक्याला मारावा लागेल हाथ

लक्षात ठेवा की मार्बल, ग्रॅनाइट किंवा ट्रॅव्हर्टाइनसारख्या दगडांच्या फरशीवर व्हिनेगर वापरू नये, कारण यामुळे त्यांची चमक कमी होऊ शकते. तसेच डिश सोपचे प्रमाण कमी ठेवावे जेणेकरून साबणाचा थर साचणार नाही. पुसून झाल्यावर पंखा चालू ठेवा किंवा खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून फरशी लवकर सुकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.