Home Buying : घर खरेदी करण्याचा विचार करताय ? 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी, अन्यथा पैसे जातील पाण्यात

घर घेताना आपण अनेकदा बऱ्याच चुका करतो. ज्यामुळे पुढे जाऊन आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते.
Home Buying
Home BuyingSaam Tv
Published On

Home Buying : आज मुंबईसारख्या शहरात घर घेणे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न आहे. हल्ली स्वत:च घर घेण्याचा विचार प्रत्येकाचा असतो. आपले देखील सुंदर घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. घर घेताना आपण अनेकदा बऱ्याच चुका करतो. ज्यामुळे पुढे जाऊन आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते.

जर तुम्ही देखील घर किंवा फ्लॅट घेत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून तुमचे कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळता येईल. मालमत्तेवर गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्यामुळे तुम्ही मालमत्तेशी संबंधित फसवणूक देखील टाळू शकता.

Home Buying
Home Loan Offer : वाढत्या व्याजानुसार 'या' बँकेने केले कर्ज स्वस्त, आता कमी दरात मिळणार !

या गोष्टी लक्षात ठेवा

आज मुंबईसारख्या (Mumbai) शहरात घर घेणे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न आहे. घर घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. अशा परिस्थितीत लोक सोसायटीतल्या फ्लॅटकडे वळतात. फ्लॅट खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

1. EMI बद्दल जाणून घ्या

घर (Home) घेण्यापूर्वी तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही विकत घेणाऱ्या घरावर EMI मिळेल का हे तपासून पहा. यासाठी डाऊन पेमेंटपासून गृहकर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी. गृहकर्जामध्ये किती रक्कम मिळत आहे, त्याचे व्याज दर काय आहे. आजकाल, इंटरनेटवर गृहकर्ज कालावधी, ईएमआय आणि गृह कर्जाच्या बाबतीत विचारपूस करायला हवी. तुम्ही गृहकर्ज जितका जास्त काळ घ्याल तितका तुमचा EMI कमी असेल. मात्र, यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त व्याज द्यावे लागेल.

2. योग्य जागा निवडा

घर घेण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कोणत्या ठिकाणी घर घ्यायचे हे ठरवावे. त्या ठिकाणची वाहतूक, आजूबाजूच्या परिसरात पार्क, शाळा, रुग्णालय अशा पायाभूत सुविधा मिळताय का ते तपासून पहा. यासोबतच खेळाचे मैदान, क्लब हाऊस, स्विमिंग पूल अशा गोष्टींची काळजी घेता येईल.

Home Buying
Home Hacks : घाईच्या वेळी कपडे झटपट कसे फोल्ड कराल? हा व्हिडिओ बघा, नक्कीच मदत होईल

3. बिल्डरची माहिती मिळवा

कोणत्याही रिअल इस्टेट प्रकल्पात पैसे गुंतवण्यापूर्वी त्या बिल्डरची माहिती मिळवा. नवीन बिल्डरकडून फ्लॅट खरेदी करण्याऐवजी, तुम्ही चांगल्या ट्रॅक रेकॉर्डसह प्रस्थापित बिल्डरकडून मालमत्ता खरेदी करू शकता.

4. कायदेशीर कागदपत्रे तपासणे आवश्यक

तुम्ही ज्या मालमत्तेत गुंतवणूक करणार आहात त्या मालमत्तेच्या कायदेशीर कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करा. तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही वकिलाची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला थोडे अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. मात्र लाखो, करोडो रुपयांच्या गुंतवणुकीसमोर ही रक्कम खूपच कमी असेल. यामुळे भविष्यात कायदेशीर अडचणी टाळण्यास मदत होईल.

5. RERA मध्ये तक्रार करा

आम्ही तुम्हाला सांगतो की रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (RERA) कडून तुम्हाला त्या प्रॉपर्टी किंवा बिल्डर्सशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. जेव्हा एखादा बांधकाम व्यावसायिक RERA कडे प्रकल्पाची नोंदणी करतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्यांनी जे काही घोषणा केल्या आहेत, त्यांना त्या पूर्ण कराव्या लागतील. जर बिल्डरने त्याच्या घोषणांची वेळेवर पूर्तता केली नाही किंवा त्यात काही चूक केली तर तुम्ही त्याच्याविरुद्ध रेरामध्ये तक्रारही करू शकता. त्यानंतर सरकारच्या बाजूने बिल्डरवर कारवाई होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com